ICC T-20 World Cup 2024: ब्रायन लारा यांनी निवडले T-20 WC स्पर्धेतील टॉप 4 संघ! चौथं नाव आश्चर्यचकीत करणारं

Brian Lara T20 World Cup 2024 Prediction: कोणते ४ संघ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात, याबाबत ब्रायन लारा यांनी भाष्य केलं आहे.
ICC T-20 World Cup 2024: ब्रायन लारा यांनी निवडले T-20 WC स्पर्धेतील टॉप 4 संघ! चौथं नाव आश्चर्यचकीत करणारं
ICC T20 World cup 2024 brian lara saam tv
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. येत्या १ जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी टॉप ४ संघांची निवड केली आहे. दरम्यान वेस्टइंडिजचे माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यांनी सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारं नाव घेतलं आहे.

ब्रायन लारा यांच्या मते अफगाणिस्तानचा टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने शानदार कामगिरी केली होती. या संघाने पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडला पराभूत करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे अफगाणिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही. आता कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ICC T-20 World Cup 2024: ब्रायन लारा यांनी निवडले T-20 WC स्पर्धेतील टॉप 4 संघ! चौथं नाव आश्चर्यचकीत करणारं
Rinku Singh Statement: '१०- १५ रुपयांसाठी तरसायचो, आता ५५ लाख..', IPL च्या मानधनाबाबत रिंकू सिंगचं मोठं वक्तव्य

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने सहज विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. शेवटी या संघाला पराभवाचा सामनी करावा लागला.

ICC T-20 World Cup 2024: ब्रायन लारा यांनी निवडले T-20 WC स्पर्धेतील टॉप 4 संघ! चौथं नाव आश्चर्यचकीत करणारं
IPL 2024 Playing XI: IPL 2024 स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग 11! तुम्हाला काय वाटतं?

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ४ गडी बाद २१२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आणि हा सामना बरोबरीत संपवला.

त्यानंतर सुपर ओव्हर झाली. पहिली सुपर ओव्हरही बरोबरीत समाप्त झाली. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ आता कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com