Shami Siraj on Pahalgam Terrorist Attack X
Sports

Pahalgam Attack : 'धर्माच्या नावाखाली...' पहलगाम हल्ल्यानंतर मोहम्मद सिराज, शमीही संतापले, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले..

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये काल पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २८ जण मृत्यूमुखी पडले. या हल्ल्यावर क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी संताप व्यक्त केला आहे.

Yash Shirke

Pahalgam Terrorist Attack : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला. यात २८ नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला, अनेकजण हल्ल्यामध्ये जखमी झाले. काश्मीरमधील या हल्ल्याचा भारतासह जगभरातून तीव्र निषेध केला जात आहे. क्रिकेट विश्वातून देखील या भ्याड हल्ल्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, शुबमन गिल यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

मोहम्मद सिराजने इन्स्टा पोस्टद्वारे सदर घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'पहलगाममधील भयानक आणि धक्कादायक दहशतवादी हल्ल्याबद्दल आत्ताच समजलं. धर्माच्या नावाखाली निष्पाप नागरिकांना लक्ष्य करुन मारणे क्रूरतेचे लक्षण आहे. कोणतेही कारण, कोणतीही विचारसरणी अशा राक्षसी कृत्याचे कधीही समर्थन करु शकत नाही. ही कसली लढाई आहे.. जिथे माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही. मृतकांच्या कुटुंबीयांना ज्या वेदना होत असतील, त्याची मी कल्पनाच करू शकत नाही. या असह्य दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. दहशतवाद्यांना कोणतीही दयामाया न दाखवता शिक्षा होईल अशी मला आशा आहे,' असे म्हटले आहे.

मोहम्मद शमीने देखील दहशतवादी हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर 'ऑल आइज ऑन पहलगाम' (All eyes on pahalgam) लिहिलेला फोटो पोस्ट केला आहे. 'पर्यटक सौंदर्य आणि शांती शोधण्यासाठी येतात, दहशतवादासाठी नाही. पहलगाममधील हल्ला हृदयद्रावक आणि अमानवी आहे. आम्ही पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहोत, असे शमीने फोटोवर लिहिले आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आजच्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यामध्ये दोन्ही संघांतील सर्व खेळाडू हातावर काळी फित बांधणार आहेत. सामन्यापूर्वी मृतकांना श्रद्धांजली म्हणून एक मिनिटं मौन पाळले जाईल. तसेच सामन्यादरम्यान चियरलीडर्स आणि आतषबाजी रद्द राहणार असल्यांची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

दरम्यान भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस दल आणि केंद्रीय संस्था दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सक्रीय झाल्या आहेत. यासाठी जोरदार शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी हल्ल्यामागील दहशतवाद्यांना पकडून त्यांना कठोर शिक्षा होईल असे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT