Pahalgam Terrorist Photo : पहलगाममध्ये निष्पाप २८ पर्यटकांचा बळी घेणाऱ्या ४ संशयित दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर

Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या चारही दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे. अंगावर आर्मीचे कपडे आणि हातात AK-47 बंदूक घेऊन उभे असलेले पर्यटक या फोटोमध्ये दिसत आहेत.
Pahalgam Terrorist Photo
Pahalgam Terrorist PhotoSaam Tv
Published On

जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करणाऱ्या चारही दहशतवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. अंगावर लष्कराचा गणवेश आणि हातामध्ये AK-47 रायफल घेऊन एकत्र उभे राहिलेला दहशतवाद्यांचा हा फोटो समोर आला असून सध्या तो व्हायरल होत आहे. सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचे स्केच काही वेळापूर्वी जारी करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचा फोटो समोर आला आहे. हा भ्याड हल्ला करण्यापूर्वीचा हा दहशतवाद्यांचा फोटो असल्याचे म्हटले जात आहे.

लष्करी जवानांच्या गणवेशात या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या चार दहशतवाद्यांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकले. फोटोमध्ये दिसणाऱ्या या दहशतवाद्यांनी २८ पर्यटकांचा जीव घेतला. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोएबा'च्‍या रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Pahalgam Terrorist Photo
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीरमध्ये कँडल मार्च, दहशतवाद्यांचा केला निषेध

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड लष्कर-ए-तोएबाचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह खालिद आहे. ३ संशयित दहशतवाद्यांची नावं देखील समोर आली आहे. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबु तल्हा अशी या दहशतवाद्यांची नावं सांगितली जात असून त्यांचे स्केच देखील जारी करण्यात आले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या हल्ल्यात आमचा हात नसल्याचे सांगितले. एनआयएची टीम पहलगाममध्ये तपास करण्यासाठी दाखल झाली आहे.

Pahalgam Terrorist Photo
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू, राज्यभरात हळहळ

मंगळवारी दुपारी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बैसरन खोऱ्यात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असताना हा भ्याड दहशतवादी हल्ला झाला. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि युएईमधील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.

Pahalgam Terrorist Photo
Pahalgam Terror Attack: "चुकीचे, चुकीचे, चुकीचे..."; दहशतवादी हल्ल्यानंतर अनुपम खेर संतापले, रडत रडत केलं सरकारला आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com