Nawaz Sharif : लाहोर कराराचं उल्लंघन करणे आपली चूक; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांनी २५ वर्षांनी दिली कबुली

Nawaz Sharif Latest news : पाकिस्तानने 1999 साली पाकिस्तानने लाहोर कराराच उल्लंघन करणे ही आपली चूक होती, अशी मोठी कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
लाहोर कराराचं उल्लंघन करणे आपली चूक; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांनी २५ वर्षांनी दिली कबुली
Nawaz Sharif Saam tv

नवी दिल्ली : पाकिस्तानने १९९९ साली लाहोर कराराचं उल्लंघन करणे आपली चूक होती, अशी कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी २५ वर्षांनंतर या चुकीची कबुली दिली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये २१ फेब्रुवारी १९९९ रोजी शांतता प्रस्थापित होण्यासाठी लाहोर करार केला होता. कारगिलमध्ये केलेल्या घुसखोरीचा उल्लेख करत शरीफ यांनी चुकीची कबुली दिली.

पाकिस्तानने केलेल्या अणुचाचणीला २६ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त पाकिस्तानात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात नवाज शरीफ बोलत होते. '२८ मे १९९८ साली पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या. अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानने एक करार केला होता. त्या कराराचं उल्लंघन केलं. ती आमची चूक होती, असं शरीफ यांनी सांगितलं.

लाहोर कराराचं उल्लंघन करणे आपली चूक; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांनी २५ वर्षांनी दिली कबुली
PM Modi: 'चहा थंड झाल्यावर लोक कानाखाली मारायचे,'; पंतप्रधान मोदींनी सांगितली लहानपणीची आठवण

काय आहे लाहोर करार?

लाहोर करारात भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी करार झाला होता. या कराराअंतर्गत शांतता, सुरक्षा आणि दोन्ही देशातील लोकंमधील संपर्काला प्रोत्साह या मुद्द्यावरून करार झाला होता. या करारानंतर कारगिलमध्ये काहींनी घुसखोरी करत या कराराचं उल्लंघन केलं. पाकिस्ताने सेन्याच्या घुसखोरीमुळे कारगिल युद्ध झालं.

लाहोर कराराचं उल्लंघन करणे आपली चूक; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांनी २५ वर्षांनी दिली कबुली
Politics News: मणिशंकर अय्यर यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; भाजपने कॉंग्रेसला घेरलं, काय आहे प्रकरण?

युद्धादरम्यान पाकिस्तानी सेन्य दलाचे प्रमुख परवेज मुशर्रफ होते. त्यांनी मुशर्रफ यांनी मार्च १९९९ साली जम्मू काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा आदेश दिला होता. या घुसखोरीमुळे पुढे मोठं युद्ध झालं. त्यावेळी भारताने युद्ध जिंकलं.

नवाज शरीफ यांना सोडावं लागलं होतं पंतप्रधानपद

पनामा पेपर्स प्रकरणात पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेल्या नवाज शरीफ यांना पद सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांना ब्रिटनमध्ये शिफ्ट व्हायला लागलं होतं. तसेच त्यांना २०१७ साली पंतप्रधानपद सोडावं लागलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com