काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर
मणिशंकर अय्यरSaam Tv

Politics News: मणिशंकर अय्यर यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; भाजपने कॉंग्रेसला घेरलं, काय आहे प्रकरण?

Congress Leader Mani Shankar Aiyar Apologize: वरिष्ठ नेत्यांच्या वक्तव्यांमुळे कॉंग्रेस अडचणीत येताना दिसत आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी चीनच्या आक्रमणासंदर्भात वापरलेल्या शब्दाबद्दल आता माफी मागितली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. कारण कॉंग्रेस नेते मनीशंकर अय्यर यांनी चीनचा उल्लेख करताना १९६२ मध्ये झालेल्या हल्ल्यासाठी 'कथित' असा शब्द वापरला आहे. भारतीय जनता पक्षाने या मुद्द्यावरून अय्यर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मात्र, त्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी स्पष्टीकरण देत 'कथित' हा शब्द 'चुकून' वापरला गेला असल्याचं म्हटलं आहे. त्याबद्दल माफी देखील अय्यर यांनी मागितली आहे.

नेहरूज फर्स्ट रिक्रूट्स हे पुस्तक फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबमध्ये प्रकाशित (Politics News) झालं. या कार्यक्रमात मणिशंकर अय्यर यांनी भाषण केलं. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये अय्यर यांनी ऑक्टोबर १९६२ मध्ये चिनी लोकांनी भारतावर कथित हल्ला केला असल्याचं म्हटलं आहे. परंतु त्यानंतर त्यांनी कथित शब्द वापरल्याबद्दल मी मनापासून माफी मागत असल्याचं म्हटलं आहे.

यापूर्वी अय्यर यांनी (Mani Shankar Aiyar) पाकिस्तानबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत, हे भारताने विसरू नये असं त्यांनी म्हटलं होतं. पाकिस्तानमध्ये दहशतवाद असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करणार नाही, असं सध्याचे सरकार का म्हणते असा सवाल देखील त्यांनी विचारला होता. दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा महत्त्वाची आहे, असं अय्यर यांनी म्हटलं. त्यावरून देखील वातावरण खूप तापलं होतं. अशातच अय्यर यांचं चीनसंदर्भातील वक्तव्य समोर आलं आहे.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर
DD Anchor Gitanjali Aiyar Passes Away: प्रसिद्ध अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन, दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली...

कॉंग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या वक्तव्यांमुळे अडचणीत येताना दिसत आहे. काँग्रेस (Congress) नेते मणिशंकर अय्यर यांनी चीनच्या आक्रमणासंदर्भात वापरलेल्या शब्दाबद्दल माफी मागितली आहे. पण भाजपने (BJP) मात्र कॉंग्रेसवर हल्लाबोल केलाय. आता मणिशंकर अय्यर यांच्य वक्तव्यामुळे कॉंग्रेस गोत्यात येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे वादाला नवीन तोंड फुटल्याचं चित्र आहे. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी देखील आता अय्यर यांच्या वक्तव्यावरून कॉंग्रेसला खडेबोल सुनावले आहेत.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर
Mani Shankar Aiyar: पाकिस्तानला सन्मान द्या, अन्यथा बॉम्ब फोडतील; कॉंग्रेस नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com