Palgham Attack IPL 2025 SRH VS MI.jpg X
Sports

Pahalgam Attack : क्रूर हल्ल्याचा क्रिकेटपटूंकडून निषेध; SRH vs MI सामन्यात आतषबाजी रद्द, चियरलीडर्सही नसणार

Pahalgam Terrorist Attack : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले. या हल्ल्याचा निषेध आणि मृतकांना आजच्या आयपीएल सामन्यात श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.

Yash Shirke

Pahalgam Terror Attack :जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये काल (२२ एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये २८ निष्पाप नागरिकांचा जीव गेला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. देशभरातून नागरिकांनी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान, आजच्या आयपीएल सामन्याआधीही या हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यापूर्वी हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघ एक मिनिटं मौन पाळतील. सामन्यात चिअरलीडर्स, आतषबाजी किंवा फटाकेबाजी यांचा समावेश नसेल. दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि मृतक नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या दंडावर काळ्या रंगाची पट्टी बांधणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर क्रिकेट विश्वातून संताप व्यक्त केला जात आहे. गौतम गंभीर, विराट कोहली, शुबमन गिल, हरभजन सिंहसह अनेकांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध करत दहशतवाद्यांना कठोर शिक्षा होईल असे आश्वासन दिले आहे.

मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन मेडो परिसरात भीषण दहशतवादी हल्ला घडला. या घटनेत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. विशेष म्हणजे, हल्लेखोरांनी धर्म विचारुन विशिष्ट धर्मीयांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेचा भाग असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) काश्मीरमधल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT