
जम्मूमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत देश हादरला आहे. भारतीय नागरिकांकडून यावर निषेध व्यक्त केला जात असून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया केल्या जातायत. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे मृतकांमध्ये ६ महाराष्ट्रातील व्यक्तींचा समावेश आहे.
काश्मीरमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्यानंतर आता देशभरातून संताप व्यक्त होतोय. याचे परिणाम क्रिकेटवरही होतायत. पाकिस्तानबरोबर पूर्णपणे क्रिकेट बंद करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागलीये. माजी क्रिकेट खेळाडू श्रीवत गोस्वामी याने या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्याने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील क्रिकेट सामने पूर्णपणे बंद व्हावं अशी मागणी केली आहे.
श्रीवतने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने म्हटलंय की, बीसीसीआयने आणि केंद्र सरकारने पाकिस्तानमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफींच्या सामन्यासाठी टीम इंडियाला पाठवण्यास नकार दिला होता. त्यावेळी काही लोकांनी खेळामध्ये राजकारण आणू नये असं म्हटलं होतं. मात्र खरंच? निरपराध भारतीय नागरिकांची हत्या करणं हा ज्यांचा राष्ट्रीय खेळ सुरु झाला आहे, त्यांना क्रिकेटच्या बॅट आणि बॉलने उत्तर द्यायचं का?
श्रीवतने त्याच्या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की, मी काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या पहलगाम लीजेंट्स लीग खेळण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी काश्मीरमध्ये शांतता पसरल्याचं दिसून आलं. त्यावेळी तिथल्या स्थानिकांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारच्या अपेक्षा दिसून आल्या होत्या. पण तिथे आता पुन्हा रक्ताच्या थारोळ्यात निष्पाप लोकं पडले आणि या आशांचा चुराडा झाला. या घटनेने मी पूर्णपणे सुन्न झालं आहे.
आपली लोकं मृत्यूमुखी पडत असताना आपण किती दिवस जिवंत राहायचं? शिवाय आपण किती दिवस खिलाडूवृत्ती दाखवायची? आता बस्स झालं, आता यावेळी नाही, अशा कठोर शब्दात त्याने मत व्यक्त केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.