Riyan Parag saam tv
Sports

Riyan Parag: OUT की NOT OUT...! बाद झाल्यानंतर थेट अंपायरशी भिडला रियान पराग, अहमदाबादच्या मैदानात मोठा ड्रामा

Riyan Parag IPL 2025: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सच्या डावात एक मोठी घडामोड पाहायला मिळाली. रियान परागला आऊट करार दिल्यानंतर त्याने अंपायरशी जोरदार वाद घातला.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल २०२५ च्या २३ व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. यावेळी गुजरात टायटन्स राजस्थानवर भारी पडल्याचं दिसून आलं. राजस्थानचा या सामन्यात 58 रन्सने पराभव झाला. दरम्यान या सामन्यात एक मोठा गोंधळ झाल्याचंही पाहायला मिळालं. राजस्थानचा खेळाडू रियान परागबाबत हा वाद झाला.

राजस्थान रॉयल्स फलंदाजी करत असताना रियानला आऊट दिल्यानंतर त्याने अंपायरशी वाद घातला. राजस्थानच्या डावात आऊट दिल्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर सोशल मीडियावर तो आऊट होता की नाही याची चर्चा सुरू झाली.

रियान परागने लगावले ३ सिक्स

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने २० ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून २१७ रन्स केले. २१८ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने १४ चेंडूत १२ रन्समध्ये त्यांचे पहिले दोन विकेट्स गमावले होते. यानंतर, रियान पराग फलंदाजीसाठी आला. त्याने तीन सिक्स लगावून राजस्थानला पुन्हा थोडं सावरलं. मात्र कुलवंत खेजरोलियाने त्याला आऊट केलं. त्याने १४ चेंडूत २६ रन्स केले.

काय झाला नेमका वाद?

राजस्थानच्या डावाच्या सातव्या ओव्हरमध्ये कुलवंत खेजरोलिया गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी परागला त्याचा चौथा बॉल योग्य पद्धतीने खेळता आला नाही. बॉल विकेटकीपर जोस बटलरच्या हातात गेला. यावेळी जोरदार अपील करण्यात आलं आणि अंपायरने त्याला आऊट करार दिला.

यानंतर रियान परागने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. बॉल बॅटला लागला नाही, असं त्याला वाटतं होतं. मात्र यावेळी बॅट जमिनीला स्पर्श करताच आवाज आला. या कारणास्तव त्याला थर्ड अंपायरकडूनही आऊट देण्यात आलं. या कारणामुळे रियान पराग चांगलाच संतापला होता.

भर मैदानात संतापला रियान

थर्ड अंपायरनेही आऊट दिल्यानंतर रियान पराग संतापला होता. त्याने बराच वेळ मैदानी अंपायरशी वाद घातला. तो त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता की, बॉल बॅटला लागला नव्हता. मैदानावरील पंचांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितलं. यावेळी रियान रागाच्या भरात पॅव्हेलियनमध्ये परतला. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याच्या पाठीवर थाप देत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सोशल मीडियावर रियान आऊट होता की नाही यावर आता प्रश्न उपस्थित झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT