
टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा एक यशस्वी कर्णधार आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्याने अनेकदा देशासाठी मोठ्या सिरीज जिंकल्या आहे. रोहित शर्माने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये तुफान फलंदाजी करून आपल्या टीमला विजयाच्या वाटेवर नेलं आहे. सध्या आयपीएल २०२५ सुरू असून रोहित शर्माबद्दल एक मोठी बातमी समोर आलीये.
मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक मानली जाते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा या ट्रॉफी जिंकलीये. रोहित शर्माची ही कामगिरी वाखणण्याजोगी आहे. दरम्यान त्याच्या कामगिरीमुळे, मुंबई क्रिकेट असोसिएशन त्याला सन्मानित करू इच्छिते. १५ एप्रिल रोजी मुंबईच्या अॅपेक्स कौन्सिलची बैठक आहे. यादरम्यान, वानखेडे स्टेडियममधील स्टँडला रोहित शर्माचे नाव देण्याबाबत चर्चा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनला त्यांच्या आठ क्लब टीमकडून विनंती मिळाली आहे. यामध्ये माजी प्रेसिडेंट शरद पवार, माजी भारतीय कर्णधार अजित वाडेकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या सांगण्यानुसार, "याबाबत सदस्यांकडून सूचना आल्या आहेत आणि अंतिम निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीतील सदस्य घेतील."
वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रोहितचं नाव मिळणार का याचा निर्णय १५ एप्रिल रोजी होणार आहे. एमसीएची वार्षिक सर्वसाधारण सभा या दिवशी होणार आहे. वानखेडे स्टेडियमच्या ईस्ट स्टँडला सुनील गावस्कर यांचं नाव देण्यात आलंय. वेस्ट स्टँडचे नाव विजय मर्चंट यांच्या नावावर आहे.
याशिवाय नॉर्थ स्टँडला दिलीप वेंगसरकर आणि सचिन तेंडुलकर यांचं नाव देण्यात आलं आहे. वानखेडे स्टेडियमच्या मीडिया गॅलरीला बाळ ठाकरे यांचं नाव देण्यात आलंय. त्यानंतर आतारोहित शर्माला हा सन्मान मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.