Shahid Afridi  X
Sports

'..तुम्ही नालायक, बिनकामाचे आहात'; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, पहलगाम हल्ल्यावरुन भारतीय सैन्यावर केली टीका

Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तानशी असलेले कनेक्शन समोर आले. यामुळे भारत सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. हल्लासाठी पाकिस्तानला कारणीभूत ठरवल्याने शाहिद आफ्रिदीचा जळफळाट झाला आहे.

Yash Shirke

Pahalgam Terrorist Attack : काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला. हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी गटाचा भाग असलेल्या रेझिस्टन्स फ्रन्टने केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर लगेच भारतीय सरकराने पाकिस्तानविरोधी कारवाई करायला सुरुवात केली. या कारवाईनंतर पाकिस्तानमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. शाहिद आफ्रिदीने केलेल्या नव्या वक्तव्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामागे भारतीय सैन्याला जबाबदार धरले आहे. 'जर एखादा फटाका भारतात फुटला तरी ते पाकिस्तानला दोषी ठरवतील. काश्मीरमध्ये तुमची ८ लाखांची सेना आहे, तरीही हे घडले. तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नसाल, तर तुम्ही नालायक आहात, बिनकामाचे आहात', असे वक्तव्य शाहिद आफ्रिदीने समा टीव्हीशी बोलताना केले.

आफ्रिदीने भारतीय प्रसारमाध्यमांवरही टीका केली. 'हल्ल्याच्या तासाभरातच त्यांचे मीडिया बॉलिवूडमध्ये बदलले. सगळ्या गोष्टींमध्ये बॉलिवूड घुसवू नका. ते लोक ज्या प्रकारे बोलत होते ते पाहून मला मज्जा येत होती. ते सर्वकाही पाहून मी खरंच चकीत झालो होतो. यांची विचारसरणी पाहा, हे लोक स्वत:ला सुशिक्षित म्हणवून घेतात', असे आफ्रिदी म्हणाला.

पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोषी ठरवणाऱ्या भारतीय क्रिकेट्सवर टीका केली. पण त्याने नाव घेणे टाळले. तो म्हणाला, 'दोन क्रिकेटपटू आहेत, जे भारतासाठी खूप वर्ष क्रिकेट खेळले आहेत. ते ब्रँड ॲम्बेसेडर होते, टॉपचे क्रिकेटर होते, ते थेट पाकिस्तानला दोष देतात. पाकिस्तानच का? मला फक्त काही पुरावा दाखवा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT