Mumbai Police Deputy Commissioner Praveen Mundhe Saam Tv
Sports

World Cup: क्रिकेटप्रेमींनो बनावट तिकिटांपासून साधव व्हा! सेमिफायनलच्या सामन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी चाहत्यांना केलं सावध

IND vs NZ, CWC 2023: अनेकजण स्टेडियमवर जाऊन सेमिफायनलच्या सामन्याचा आनंद घेणार आहेत.

Bharat Jadhav

(सचिन गाड)

World Cup Semi Final IND vs NZ Fake Tickets :

टीम इंडिया आणि न्युझीलंडच्या क्रिकेट संघात सेमिफायनलचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना कसा होईल, कोणता संघ फायनलचं तिकीट मिळवणार हे जाणून घेण्यासाठी क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेकजण स्टेडियमवर जाऊन सेमिफायनलच्या सामन्याचा आनंद घेणार आहेत. तुम्हीही तोच विचार करत असाल तर थांबा, मुंबई पोलिसांनी दिलेल्या सुचनांचं पालन करा. (Latest News)

वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार होऊ लागलाय. काळ्या बाजारात तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. मूळ किमतीच्या तब्बल २० पट दराने तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. यामुळे क्रिकेट चाहत्यांनी तिकीट घेताना काळजी घ्यावी. तसेच आश्वासनांना बळी न पडण्याच आवाहन मुंबई पोलीस उपआयुक्त प्रवीण मुंढे यांनी केलंय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारतविरुद्ध न्यूझीलंडचा सामना होणार आहे. हा सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी प्रेक्षक कोणतेही किंमत मोजायला तयार आहेत. पण काळ्या बाजारात तिकीट घेत असाल तिकिटाच्या जागी तुमची फसवणूक होण्याचा धोका जास्त आहे. तिकिटे मिळवून देण्यासंबंधीचे मेसेजेस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात फसवणूक होण्याची भीती अधिक असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे.

भारतविरुद्ध श्रीलंका सामन्यादरम्यान बनावट तिकिटे विकल्याबद्दल काही लोकांवर गुन्हे दाखल केल्याचं मुंबई पोलीस उपआयुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितलं. दोन ते अडीच हजार रुपयांची तिकीट तब्बल ४० हजार रुपयांना विकली जात आहेत. मुंबई पोलिसांनी एकदिवसीय वर्ल्ड कप २०२३ च्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी २ जणांवर आयपीसी ४२० आणि ५११ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

काळ्या बाजारात एका तिकीटाचं दर १ लाख २० हजार रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. याप्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केलाय. पोलिसांनी आकाश ठक्कर नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. सोशल मीडियावर तिकीटांचे मेसेज येत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नये. खोट्या आश्वासनांना विश्वास ठेवणे म्हणजे फसवणुकीला आमंत्रण देण्यासारखे असल्याचं पोलिसांचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT