World cup SA vs NED: नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने घेतली गोलंदाजी; टॉसआधी स्टेडियममध्ये आधी खेळला वरुणराजा

SA vs NED : धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील १५ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्समध्ये होत आहे.
world cup 2023 SA vs NED
world cup 2023 SA vs NED X Icc
Published On

world cup 2023 SA vs NED :

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील १५ वा सामना आज होत आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्समध्ये होत आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणफेक जिंकली असून कर्णधार टेंबा बवुमाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान धर्मशाळे पाऊस झाल्यामुळे नाणेफेकसाठी उशिरा झाला होता. (Latest News)

धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर या दोन्ही संघात सामना खेळला जात आहे. नेदरलँड्सच्या संघाला कमजोर मानले जात आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणताच संघ हा कमजोर नसतो. तर दक्षिण आफ्रिकेने आधीचे दोन सामने जिंकून चार गुण मिळवले असून आजचा सामना जिंकून त्यांना गुणतालिकेत अव्वल बनण्याची संधी आहे.

पाऊस झाल्यामुळे हा सामना ५० षटकांऐवजी फक्त ४३ षटकांचा होणार आहे. दुपारी २ वाजता खेळ सुरू होणार होता परंतु पावसामुळे दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्समधील सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. पाऊस थांबल्यानंतर ४ वाजता सामन्याचा पहिल्या चेंडू टाकण्यात आला. दरम्यान दोन्ही संघातील प्लेइंग ११ मध्ये एक-एक बदल करण्यात आलाय.

दोन्ही संघाची प्लेइंग ११ अशी आहे

नेदरलँड्स

-विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ'डॉड, कॉलिन एकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (wk/c), सिब्रांड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

दक्षिण आफ्रिका -

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.

world cup 2023 SA vs NED
WorldCup2023: बुमराह कपिल देवचा ३१ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड तोडू शकतो; काय आहे माजी कर्णधाराचा विक्रम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com