WorldCup2023: बुमराह कपिल देवचा ३१ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड तोडू शकतो; काय आहे माजी कर्णधाराचा विक्रम

Jasprit Bumrah: भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे एक विक्रम करण्याची संधी आहे.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahBccI X (Saam Tv)
Published On

Jasprit bumrah Record :

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या वर्ल्डकपमधील तिसरा सामना पाकिस्तानविरुद्धात खेळला. या सामन्यात भारताने आठव्यांदा पाकिस्तानला पराभूत केलं. दरम्यान या सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजी करत पाकच्या फलंदाजांना धावा करू दिल्या नाहीत. पाकच्या खेळाडूंना एक-एक धावेसाठी झगडावे लागले. जसप्रीत बुमरहाने दोन बळी घेत एक षटक निर्धाव टाकले. या सामन्यात बुमराहला 'प्लेअर ऑफ द मॅच' घोषित करण्यात आलं.(Latest News)

भारताचा सामना आता बांगलादेश विरुद्धात होणार आहे. या सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे एक विक्रम करण्याची संधी आहे. जर त्याने हा विक्रम केला तर तो भारताचा माजी कर्णधार कपिल देवला मागे टाकणार आहे. येत्या गुरुवारी टीम इंडियाचा सामना बांगलादेशाविरुद्ध होणार आहे.

दुखपातीनंतर मात करत भारतीय संघात पुनरागमन करत बुमराहने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केलीय. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत तीन ३ सामने खेळले आहेत. या सामन्यामध्ये ८ विकेट घेतल्या आहेत. याचवेळी बुमराहकडे मोठा विक्रम करण्याची संधी आहे. हा विक्रम ३१ वर्षापूर्वी कपिल देव यांनी केला होता. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या १२ वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये २६ बळी घेतले आहेत. बांगलादेशविरुद्ध तो १३ वा सामना खेळणार आहे.

ाच सामन्यात बुमराह कपिल देवच्या पुढे जाऊ शकतो. क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक बळी घेतलेल्या गोलंदाजामध्ये कपिल देवा यांच्या नावाचा समावेश आहे. कपिल देव यांनी १९७९ ते १९९२ या काळात २८ बळी घेतले आहेत. तर बुमराहकडे कपिल देव यांना मागे टाकण्याची संधी आहे. कपिल देव यांना मागे टाकण्यासाठी बुमराला फक्त ३ बळी घ्यावे लागतील.

क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारे

  • झहीर खान -४४

  • जवागल श्रीनाथ- ४४

  • मोहम्मद शमी- ३१

  • अनिल कुंबळे -३१

  • कपिल देव -२८

  • जसप्रीत बुमराह -२६

Jasprit Bumrah
Fight In Cricket Stadium: क्रिकेट चाहत्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं, भारत- श्रीलंका सामन्यानंतर नेमकं काय घडलं ? पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com