Shreya Maskar
संध्याकाळी नाश्त्याला काही तरी चटपटीत खावेसे वाटत असेल तर तांदळाचे नगेट्स उत्तम पर्याय आहे. यामुळे तुमचा वेळही खूप वाचतो.
कच्च्या तांदळापासून कुरकुरीत नगेट्स बनवण्यासाठी तांदूळ, आलं, बटाटे, शिमला मिरची, कोथिंबीर, जिरे, पिझ्झा मसाला, चिली फ्लेक्स इत्यादी साहित्य लागते.
कच्च्या तांदळापासून कुरकुरीत नगेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम कच्चा तांदूळ एक तास पाण्यात भिजवून ठेवा. जर तुम्हाला तांदूळ झटपट भिजवायचा असेल तर गरम पाण्याचा वापर करा.
दुसरीकडे कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. बटाटे उकडल्यावर त्यांची साल काढून एका बाऊलमध्ये चांगले मॅश करा.
एक तासानंतर तांदळाचे पाणी गाळून तांदूळ मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या. यात दोन हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा टाकून घट्ट पेस्ट बनवा.
वाटलेला तांदूळ एका बाऊलमध्ये काढा आणि त्यात उकडलेले बटाटे मॅश करा. यात बारीक चिरलेली शिमला मिरची, गाजर आणि हिरवी कोथिंबीर मिक्स करा
त्यानंतर मिश्रणात चवीनुसार मीठ, जिरे, पिझ्झा मसाला आणि काळी मिरी पूड घाला. तसेच तुमचे आवडीचे इतर मसाले देखील टाका. सर्व मिश्रण एकजीव करून हाताला तेल लावून त्याचे छोटे गोळे बनवा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तांदळाचे नगेट्स खरपूस तळून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवा. जेणेकरून रेसिपी जळणार नाही.