आयपीएलची क्रेझ किती आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. काही खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने सोडून ही स्पर्धा खेळण्यासाठी भारतात येत असतात. मग पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सोडून येणं ही काय खूप मोठी गोष्ट नाही.
मात्र हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काही पटलेलं नाही. पीएसएल सोडून आयपीएल खेळण्यासाठी भारतात येणाऱ्या कॉर्बिन बॉशला पीसीबीने पीएसएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काय आहे प्रकरण? जाणून घ्या.
दक्षिण आफ्रिकेकडून खेळणाऱ्या या खेळाडूला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यातून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेसाठी त्याला डायमंड श्रेणीत ठेवण्यात आलं होतं. त्याला पेशावर जाल्मी संघाने आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू लिजाद विलियम्स दुखापतीमुळे मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडल्यानंतर, त्याच्या जागी बॉशला संघात स्थान दिलं गेलं आहे.
बॉशला आता पीसीबीने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ज्यात त्याने कॉन्ट्रॅक्ट असा मध्येच सोडल्यामुळे उत्तर मागितलं आहे. त्याला या नोटीसला उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. आयपीएल २०२५ स्पर्धा येत्या २२ मार्चपासून सुरु होणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. २०१६ पासून सुरु झालेली ही स्पर्धा पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा सुरु असताना खेळवली जाणार आहे.
दरवर्षी ही स्पर्धा फेब्रुवारी ते मार्चदरम्यान खेळवली जाते. मात्र आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इतर मालिकांमुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली. ही स्पर्धा एप्रिल - मे दरम्यान खेळवली जाणार आहे. ज्या खेळाडूंना आयपीएलमध्ये कोणीही खरेदीदार मिळालं नव्हतं, अशा खेळाडूंनी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेसाठी नाव नोंदवलं होतं. त्याला या स्पर्धेत घेतलं, मात्र त्याने आता ही स्पर्धा सोडून आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.