मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे.
हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. यावेळी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्यासमोर मोठं आव्हान असणार आहे.
मुंबई इंडियन्सने २०१३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना पहिल्यांदा जेतेपदावर नाव करोलं होतं. गेल्या हंगामात मुंबईने ५ वेळेस जेतेपदाचा मान मिळवला आहे. मात्र यादरम्यान मुंबईला ओपनिंगचा सामना जिंकता आलेला नाही. सर्वात यशस्वी संघाला २०१३ पासून स्पर्धेतील पहिला सामना जिंकता आलेला नाही. २०१३ पासून मुंबईने ११ ओपनिंग सामने खेळले आहेत. हे सर्व सामने मुंबईने गमावले आहेत. आता हार्दिक पंड्या ही साखळी मोडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्सविरद्ध होणार आहे. गेल्यावर्षी गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या यावेळी मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर युवा फलंदाज शुभमन गिल गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून ३ वेळेस पराभवाचा सामना करावा लागला आहे.तर केकेआर,दिल्ली कॅपिटल्स. आणि आरपीएसने प्रत्येकी २-२ वेळेस पराभूत केलं आहे. (Cricket news in marathi)
आयपीएल २०१३ पासून पहिल्या सामन्यात असा राहिलाय मुंबईचा रेकॉर्ड..
आयपीएल २०१- RCB कडून पराभव
आयपीएल २०१४- KKR कडून पराभव
आयपीएल २०१५- KKR कडून पराभव
आयपीएल २०१६- RPS कडून पराभव
आयपीएल २०१७- RPS कडून पराभव
आयपीएल २०१८- CSK कडून पराभव
आयपीएल २०१९- DC कडून पराभव
आयपीएल २०२०- CSK कडून पराभव
आयपीएल २०२१- RCB कडून पराभव
आयपीएल २०२२- DC कडून पराभव
आयपीएल २०२३- RCB कडून पराभव
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.