Mumbai Indians Saam tv
Sports

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आमदाराचा पुतण्या, कोण आहे क्रिश भगत?

Who is Krish Bhagat Mumbai Indians Replacement: क्रिश भगतची मुंबई इंडियन्सच्या संघात एन्ट्री झाली आहे. अथर्व अंकोलेकरच्या जागी क्रिश भगतला घेण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई इंडियन्समध्ये क्रिश भगतची एन्ट्री

अथर्व अंकोलेकरच्या जागी खेळणार

कोण आहे क्रिश भगत?

आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात महत्त्वाचा बदल झाला आहे. मुंबईच्या संघाच क्रिश भगतची एन्ट्री झाली आहे. अथर्व अंकोलेकरच्या जागी क्रिश भगतला घेण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सने याबाबत घोषणा केली आहे.

आयपीएल २०२६ सुरु होण्यापूर्वी अथर्व अंकोलेकरच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला संघाबाहेर राहावे लागले होते. यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या चार सामन्यात अथर्व खेळला नव्हता. त्यानंतर आता त्याच्या जागी क्रिश भगतची अधिकृत एन्ट्री झाली आहे. त्याला आता आयपीएलमध्ये खेळण्याची संघी मिळणार आहे.

कोण आहे क्रिश भगत? (Who is Krish Bhagat Mumbai Indians)

क्रिश भगत हा २१ वर्षीय अष्टपैलू खेळाडू आहे. तो देशांतर्गत पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. तो उजव्या हाताने गोलंदाजीसह फलंदाज म्हणूनदेखील खेळू शकतो. तो गेल्या दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या ट्रायल्सचा भाग आहे.

क्रिश भगत यावर्षी डीवाय पाटील टी २० चषकात रिलायन्सकडून खेळला होता. क्रिशने समर्पण, कामाप्रती असलेली निष्ठा, प्रत्येक सत्र आणि सराव सामन्यातील कामगिरीने प्रशिक्षकांना प्रभावित केले आहे. असं मुंबई इंडियन्सने निवेदनात म्हटलं आहे.

आमदाराचा पुतण्या

क्रिश भगत हा जालंधर पश्चिमचे आमदार मोहिंदर भगत यांचा पुतण्या आहे. त्याच्या सुरुवातीच्या कारकि‍र्दीत त्याला पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याचे आयुष्यच बदललं. दुखापतीवर मात करत त्याने पुन्हा पुनरागमन केले. दुखापतीनंतर त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले. कूचबिहार ट्रॉफीमध्ये त्याने ५०० हून अधिक धावा केल्या. कर्नल सी. के नायडू ट्रॉफीमध्ये ३० फलंदाजांना आउट करत आपला उत्तम खेळ दाखवला, याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT