Ashok Sharma IPL: शेतकऱ्याच्या मुलाने फेकला आयपीएल २०२६ मधील सर्वात वेगवान चेंडू, वाचा कोण आहे अशोक शर्मा?

Fastest ball IPL 2026: IPL 2026 मध्ये गुजरात टायटन्सचा युवा गोलंदाज अशोक शर्माने 154.2 किमी वेगाने चेंडू टाकत सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या या कामगिरीमुळे तो भारतातील वेगवान गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
Ashok Sharma IPL
Ashok Sharma IPLSAAM TV
Published On

अहमदाबादच्या मैदानावर शनिवारी वेगाची खरी जादू पाहायला मिळाली. आयपीएलमध्ये एका तरुण भारतीय गोलंदाजाने त्याच्या तुफान वेगाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. इंडियन प्रीमियर लीग 2026 मध्ये गुजरात टायटन्सच्या वेगवान गोलंदाज अशोक शर्मा याने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात उत्तम कामगिरी केली.

शनिवारी म्हणजेच 4 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अशोकने 154.2 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकत यंदाच्या सिझनमधील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा रेकॉर्ड केला.

या आधी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातही अशोकने चांगली गोलंदाजी केली होती. इतकंच नाही तर राजस्थानविरुद्धही त्याने आक्रामक कामगिरी केली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्याने 145 किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली. तर संपूर्ण स्पेलमध्ये तीच गती कायम ठेवली.

Ashok Sharma IPL
IPL 2026: पराभव KKR चा, फटका मात्र CSK ला; हैदराबादच्या विजयाने बदललं पॉईंट्स टेबलचं समीकरण

सामन्याच्या 16व्या ओव्हरमध्ये अशोकने कमाल केली. त्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू अशोकने ध्रुव जुरेलला 154.2 किमी प्रतितास वेगाने टाकला. हा चेंडू अचूक यॉर्कर होता आणि जुरेलला तो कसाबसा खेळता आला.

या कामगिरीमुळे अशोक शर्माने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. तो आता IPL इतिहासात 154 किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या खास यादीत सामील झालाय. याआधी उमरान मलिक आणि मयंक यादव यांनी ही कामगिरी केलीये आहे. उमरान मलिकने IPL 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकत भारतीयांमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून रेकॉर्ड केला होता.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारे खेळाडू

  • शॉन टेट- 157.7 KMPH

  • लॉकी फर्ग्युसन- 157.3 KMPH

  • उमरान मलिक- 157.0 KMPH

  • मयंक यादव- 156.7 आणि 155.8 KMPH

  • एनरिक नॉर्किया- 156.2 KMPH

Ashok Sharma IPL
IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

कोण आहे अशोक शर्मा?

23 वर्षांचा अशोक शर्मा राजस्थानचा रहिवासी आहे. तो आपल्या राज्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळतो. करिअरच्या सुरुवातीला त्याची गोलंदाजी फारशी प्रभावी नव्हती. मात्र गेल्या दोन वर्षांत त्याने स्वतःमध्ये मोठा बदल घडवून आणलाय.

१७ जून २००२ रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अशोकचा मोठा भाऊ अक्षयने त्याचं क्रिकेटपटू म्हणून असलेलं करिअर घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अक्षयला स्वतःला क्रिकेटपटू व्हायचं होतं पण त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती नव्हती. अक्षयने आपल्या लहान भावासाठी क्रिकेट सोडून दिलं आणि सावलीप्रमाणे त्याच्या पाठीशी उभा राहिला.

Ashok Sharma IPL
IPL 2026: पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; चेन्नईची थेट सहाव्या स्थानावर घसरण, पहिल्या नंबरवर कोण?

सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत अशोकने राजस्थानकडून 10 सामन्यांत 22 विकेट घेतल्या. त्याने आतापर्यंत 4 फर्स्ट क्लास, 7 लिस्ट-ए आणि 12 टी20 सामने खेळले आहेत. यात फर्स्ट क्लासमध्ये 14, लिस्ट-एमध्ये 13 आणि टी20 मध्ये 24 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

Ashok Sharma IPL
DC vs MI Result : एकटा रिझवी भिडला, नडला! दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सची सर्वात कमकुवत बाजू आली समोर

अशोक शर्मा यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सच्या टीमचा भाग होता. मात्र IPL मध्ये डेब्यू करण्याची संधी गुजरात टायटन्सने दिली. IPL 2026 साठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये गुजरातने त्याला 90 लाख रुपयांना खरेदी केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com