
गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडमधील डीवाय पाटील महाविद्यालयात बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडालीय. धमकीचा ईमेल महाविद्यालयाला मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलीस दल दाखल झाले आहे. आकुर्डी येथील डॉ. डीवाय पाटील महाविद्यालय उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आल्यानंतर सर्वांची धांदल उडाली. कॉलेजमध्ये बीडीएस पथक आणि डॉग स्क्वॉडने बॉम्ब शोध मोहीम सुरू आहे.
परीक्षा सुरू असल्याने महाविद्यालय परिसर गजबजेला आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांची देखील १०० टक्के उपस्थिती पाहायला मिळत आहे. बॉम्बची धमकी मिळल्यानंतर विद्यार्थी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे या ई-मेलची तत्काळ दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
बॉम्बस्कॉडनेही डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये तपासणी केली, पण हाती आले नाही. कुणीतरी जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा करत इमेल केल्याचं सांगितलं जातं आहे. बॉम्बची फक्त अफवा होती हे लक्षात आल्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला. यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील काही शाळा आणि महाविद्यालयांना बॉम्बद्वारे उडून देण्याची धमकी मिळाली होती. मात्र कुणीतरी खोडसाळपणा करण्यासाठी अशाप्रकारे धमकीच ईमेल पाठवलं असावं, असं पोलीस तपासात उघडकीस आलं होतं.
दरम्यान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. त्यामुळे त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झाला होतं. बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. सकाळी साडे अकराच्या सुमारास धमकीचा ई-मेल आला. ईमेल येताच पोलिसांच्या कंट्रोल रुमला महाविद्यालय प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. त्यानंतर बिडीडीएसचं पथक तातडीनं महाविद्यालयात दाखल झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.