police
policeSaam tv

Pune News: 'हॅलो!! इथं बलात्कार झालाय..' पोलीस ठाण्यात वाजला फोन, घटनास्थळी घेतली धाव, समोर जे पाहिलं..

Pune police hoax Call Drunk man misleads call: पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांना एक कॉल आला होता. त्या कॉलमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं बलात्कार झाल्याचं सांगितलं. पुढे जे झालं..
Published on

पुण्यातील स्वारगेट बस डेपोत झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. यानंतर पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांना एक कॉल आला होता. त्या कॉलमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं 'इथं बलात्कार झाला' असल्याचं सांगितलं. पोलिसांनी तातडीनं संबंधित ठिकाणी धाव घेतली. मात्र, एका मद्यपीनं दारूच्या नशेत कॉल केला असल्याचं उघड झालं.

ही घटना रविवारी ९ मार्चला घडली. श्रीनिवास अकोले या व्यक्तीनं दारूच्या नशेत पोलीस हेल्पलाइन ११२ वर कॉल केला होता. कॉल करून श्रीनिवासनं पोलिसांना 'इथं बलात्कार झाला' असं सांगितलं. कॉलवर पोलिसांची दिशाभूल करणाच्या प्रयत्न केला.

police
Shocking Crime: तृतीयपंथीयांचं गुरू होण्यासाठी गुप्तांग कापलं, किन्नर प्रमुखाला धाडायचं होतं जेलमध्ये पण..

कॉल आल्यानंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काईगडे, निरीक्षक नीलेश बडाख यांच्या अन्य अधिकारी आणि अंमलदारांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांनी तक्रारदाराला कॉल केला. श्रीनिवास अकोले यांनी आपणच फोन केला असल्याचं सांगितलं.

police
Political Shifts: भाजपचा ठाकरेंना पुन्हा धक्का! कोकणातील प्रमुख नेते कमळ हाती घेणार

श्रीनिवासची विचारपूस केली. तो अडखळत बोलत होता. पोलिसांना ठोस माहिती तो देऊ शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरीकांकडे विचारपूस केली. मात्र, चौकशीत अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचं परिसरातील लोकांनी सांगितलं.

अकोले याची चौकशी केली असता, पोलिसांना तो दारूच्या नशेत आढळला. त्यानं खोटी माहिती दिली असल्याचं त्यानं सांगितलं. यानंतर पोलिसांनी नागरीकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सेवेचा गैरवापर केल्याप्रकरणी श्रीनिवासवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com