Mumbai Qualify in IPL 2025 X
Sports

मुंबई इंडियन्सचा IPL 2025 च्या प्लेऑफमध्ये दमदार प्रवेश, दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान संपुष्टात

Mumbai Qualify in IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्लस हा सामना मुंबईने जिंकला आहे. या विजयामुळे मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

Yash Shirke

MI Vs DC IPL 2025 : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. दिल्लीवर विजयानंतर मुंबईने आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारा मुंबई इंडियन्स हा चौथा संघ आहे. पराभवामुळे आयपीएल २०२५ मधील दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान संपुष्टात आले आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल आजारी पडल्याने आजच्या सामन्यात सहभागी झाला नाही. यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे मोठे नुकसान झाले. दिल्लीने फाफ डु प्लेसिसकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली. फाफने टॉस जिंकला आणि दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे फलंदाज मैदानात उतरले. २० ओव्हर्समध्ये मुंबईने १८० धावा केल्या.

सलामीला आलेला रोहित शर्मा फक्त ५ धावांवर परतला. त्यानंतर रायन रिकल्टन (२५ धावा), विल जॅक्स (२१ धावा) अशा पटापट विकेट्स पडल्या. सूर्यकुमार यादवने मोर्चा सांभाळला. तिलक वर्माने साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तो २७ धावांवर बाद झाला. तोपर्यंत मुंबईची सामन्यामधील पकड सुटल्याचे पाहायला मिळाले. तिलकनंतर आलेला हार्दिक पंड्या लवकर बाद झाला. नमन धीरच्या साथीने सूर्यकुमार यादवने मुंबईचा खेळ १८० धावांपर्यंत नेला. सूर्याने नाबाद ७३ धावा केल्या. तर नमन धीरने ३०० च्या स्ट्राईक रेटने ८ चेंडूत २४ धावा केल्या. खासकरुन शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये दोघांनी आक्रमक खेळी केली. दुसऱ्या बाजूला, दिल्लीकडून मुकेश कुमारने २ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.

१८१ धावांचे आव्हान पेलताना दिल्लीचे फलंदाज मैदानात आले. केएल राहुल, फाफ डु प्लेसिस आणि अभिषेक पोरेल लवकर बाद झाले. समीर रिझवी (३९ धावा) आणि विपराज निगम (२० धावा) यांनी लढा देण्याचा प्रयत्न केला. ट्रिस्टन स्टब्स, माधव तिवारी, दुष्मंथा चमीरा अशा लागोपाठ विकेट्स पडल्या. आशुतोष शर्माने १८ धावा केल्या. मुंबईने सुरुवातीपासून दिल्लीच्या फलंदाजांवर दबाव टिकवून ठेवला. मिचेल सँटनरने कमाल गोलंदाजी केली. त्याने ४ ओव्हर्समध्ये ११ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. सोबतीला जसप्रीत बुमराहने देखील ३ विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, विल जॅक्स, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी १ अशा ४ विकेट्स घेतल्या. दिल्लीने फक्त १२१ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११

फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अभिषेक पोरेल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्स, दुष्मंथा चमीरा, विपराज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११

रायन रिकल्टन, रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा तडाखा, नदी-नाल्यांना पूर; रस्ते वाहतूक ठप्प, शेती पाण्याखाली

Maharashtra Live Update: उल्हासनगरातल्या क्रीडांगणांसाठी 100 किमी धावला तरुण

Kalyan Protest: मासविक्री बंदीविरोधात खाटिक समाज आक्रमक, KDMC समोर कोंबड्या घेऊन आंदोलन; पाहा VIDEO

Janmashtami 2025 : जन्माष्टमीच्या दिवशी घरात या वस्तु ठेवल्यास येऊ शकते नकारात्मकता

Viral Video: कारला उडवलं नंतर पोलिसांना चकवा; भरधाव वेगात कॅब चालकाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT