mumbai crowd twitter
क्रीडा

Mumbai Crowd: ये है मुंबई मेरी जान! मुंबईकरांना मोडून काढला अर्जेंटिनाच्या वर्ल्डकप रॅलीचा रेकॉर्ड

Mumbai Crowd Breaks Argentina's Record: भारतीय संघाच्या विजयी रॅलीमध्ये लाखो मुंबईकरांनी सहभाग घेतला होता. यासह गर्दीच्या बाबतीत मुंबईकरांनी अर्जेंटीनाचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

ये है मुंबई मेरी जान, गुरुवारी प्रत्येक मुंबईकराच्या तोडांवर हेच वाक्य होतं. दुपारच्या वेळी भरउन्हात आणि रात्री उशिरापर्यंत पावसात उभं राहूनही मुंबईकरांचा उत्साह काही कमी झाला नाही. भारतीय संघ विजयाचा जल्लोष करण्यासाठी मुंबईत दाखल झाला. भारतीय संघाची विजयाची परेड ही ४ वाजता नरिमन पॉईंट इथून निघणार होती.

ही परेड थेट मरीन ड्राईव्ह जवळ असलेल्या वानखेडे स्टेडियमवर जाऊन थांबणार होती. खेळाडूंना यायला उशीर झाला, मात्र मुंबईकर काही जागचे हलले नाहीत. मुंबईकरांनी वाट पाहिली आणि आपल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचं जल्लोषात स्वागत केलं. दरम्यान मुंबईकरांनी अर्जेंटिनाच्या गर्दीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

भारतीय संघाने २९ जून रोजी आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. क्रिकेट फॅन्सना १७ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकप विजयाचा जल्लोष साजरा करण्याची संधी मिळाली. ट्रॉफी भारतात आली आणि विजयी रॅली मुंबईतून निघणार असेल,तर मुंबईकर तरी का मागे राहतील. क्रिकेट फॅन्सने सकाळपासूनच मरीन ड्राईव्हवर तुफान गर्दी केली.

खेळाडूंची विजयी परेड संध्याकाळी ६-७ नंतर मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल झाली. मात्र मुंबईकर काही जागचे हलले नाहीत. खेळाडूंचं जल्लोषात स्वागत केलं आणि या जिद्दी मुंबईकरांनी गर्दीच्या बाबतीत अर्जेंटिनाला मागे सोडलं.

मेस्सीच्या अर्जेंटिनाने ज्यावेळी फिफा वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी अर्जेंटिनाचे फॅन्सने आपल्या संघाचं अभिनंदन करण्यासाठी तुफान गर्दी केली होती. त्यावेळी अर्जेंटिनाच्या गर्दीचा फोटो तुफान व्हायरल झाला होता. आतापर्यंत क्रीडा विश्वातील कुठल्याच संघाला इतका पाठींबा मिळाला नव्हता. मात्र टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी मुंबईत येणार हे कळताच मुंबईकरांनी मरीन ड्राईव्हची वाट धरली. ३५ ते ४० हजाराहून अधिक लोकं हे वानखेडे स्टेडियमच्या आत होते.

तर याहून ५ पट अधिक लोकं स्टेडियमच्या बाहेर, भारतीय संघाच्या विजयी रॅलीची वाट पाहत उभे होते. या गर्दीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अफाट सपोर्ट पाहून रोहितही भारावून गेला होता. प्रत्येकाला क्रिकेट फॅन्सला हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करायचे होते. क्रिकेटपटूंनीही आपले मोबाईल काढले आणि हे अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्रात बहुमत कोणाला ? मविआचा प्लान बी तयार

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT