IND vs ZIM: रियान परागचं रोहितच्या पावलावर पाऊल! पहिल्याच दौऱ्यावर केली ही मोठी चूक

Riyan Parag Viral Video: युवा खेळाडूंचा भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
IND vs ZIM: रियान परागचं रोहितच्या पावलावर पाऊल! पहिल्याच दौऱ्यावर केली ही मोठी चूक
rohit sharma riyan paragsaam tv
Published On

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू वर्ल्डकप स्पर्धेतून परतल्यानंतर आराम करणार आहेत. तर आयपीएल गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. ज्यात अभिषेक शर्मा आणि रियान परागसारख्या युवा खेळाडूंचा समावेश आहे. रियान पराग पहिल्यांदाच भारतीय संघाकडून खेळण्यासाठी दौऱ्यावर गेला आहे. दरम्यान पहिल्याच दौऱ्यावर त्याच्याकडून मोठी चूक झाली आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

रोहित शर्मा क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. अनेकदा स्टम्प माईकमध्ये त्याचे मजेशीर संवाद रेकॉर्ड केले गेले आहेत. मात्र त्याची वस्तू विसरण्याची सवय ही जगजाहीर आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एका मुलाखतीत असा खुलासा केला होता की, रोहितला वस्तू विसरण्याची सवय आहे. तो कधी पासपोर्ट तर कधी स्वत:चा मोबाईलही विसरला आहे. दरम्यान आपल्या पहिल्याच दौऱ्यावर रियान परागनेही अशीच चूक केली आहे.

IND vs ZIM: रियान परागचं रोहितच्या पावलावर पाऊल! पहिल्याच दौऱ्यावर केली ही मोठी चूक
IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.ज्यात रियान परागने म्हटले की, ' माझं लहानपणापासूनच असं प्रवास करायचं स्वप्न होतं. क्रिकेट तर आम्ही आधीपासून खेळतोय, मात्र क्रिकेट व्यतिरिक्तही खूप गोष्टी असतात. ज्यात भारतीय संघाची जर्सी घालणं, भारतीय संघासोबत प्रवास करणं. मा इतका उत्साही झालो होतो की, मी पासपोर्ट आणि मोबाईल विसरलो. फोन विसरलो नव्हतो, पण इकडे तिकडे ठेऊन विसरलो होतो. मात्र आता दोन्ही गोष्टी माझ्याकडे आहेत.'

IND vs ZIM: रियान परागचं रोहितच्या पावलावर पाऊल! पहिल्याच दौऱ्यावर केली ही मोठी चूक
Rohit Sharma Barbados VIDEO: T20 चॅम्पियन झाल्यानंतर रोहितने पिचवरची माती का खाल्ली?

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांसाठी असा आहे भारतीय संघ:

शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा , आवेश खान, खलील अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com