Lionel Messi Car Narrowly Escapes Crash : जगातील प्रसिद्ध आणि दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) कार अपघातामध्ये थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होत आहे. लिओनेल मेस्सीने ट्रॅफिक सिग्नल तोडला. त्यानंतर त्याच्या कारने दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली असती. पण या घटनेमध्ये तो थोडक्यात बचावला.
लिओनेल मेस्सी नुकताच आपल्या कुटुंबीयांसोबत शॉपिंगसाठी मायामी सिटीला गेला होता. मेस्सी आपली कार ऑडी क्यू 8 ने प्रवास करत होता. मेस्सीच्या कारसोबत फोर्ट लॉडरडेल पोलिसही जात होते. मेस्सीने सिग्नल तोडला. तेवढ्याच दुसऱ्या दिशेने येणाऱ्या कारने त्याच्या कारला जोरदार धडक दिली असती. पण या अपघातात मेस्सीची कार थोडक्यात बचावली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रत्यक्षात मेस्सीची कार सिग्नल तोडून पुढे जाते होती. त्याचवेळी पलिकडच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारच्या चालकाने हुशारी दाखवत आपल्या गाडीचा वेग कमी केला. त्यामुळे मोठा अपघात टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. पांढऱ्या रंगाच्या ऑडी Q7 मध्ये लिओनेल मेस्सी उपस्थित होता की नाही याची माहिती अद्याप मिळालेली नाही. कार अपघातातून बचावल्यानंतर फ्लोरिडा पोलिसांनी ही कार मेस्सीच्या घरापर्यंत पोहोचवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे. फुटबॉल क्लब बार्सिलोना नावाच्या व्हेरिफाईड अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
दरम्यान, पीएसजी सोडल्यानंतर लिओनेल मेस्सी आता मेजर लीग सॉकर टीम मियामीमध्ये सहभागी झाला आहे. पण त्याने अद्याप पदार्पण केलेले नाही. लिओनेल मेस्सीच्या टीम अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले. त्याने फ्रान्सचा 4-2 असा पराभव करून ट्रॉफी जिंकली. अर्जेंटिनाने अखेरचा फिफा विश्वचषक 1986 मध्ये जिंकला होता. 2022 च्या विजयासह लिओनेल मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही पूर्ण झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.