Team India Victory Parade: टीम इंडियाच्या विजय रॅलीदरम्यान अनेकांचा दम घुसमटला; मरीन ड्राइव्हला चपलांचा खच; पाहा VIDEO

Fans Injured During Team India Victory Parade: मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये ऐवढी गर्दी झाली होती की चेंगराचेंगरीसारखी घटना घडली आणि अनेक जण जखमी झाले. यावेळी काहींना श्वास घेण्यास देखील त्रास झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Team India Victory Parade: टीम इंडियाच्या विजय रॅलीदरम्यान अनेकांचा दम घुसमटला; मरीन ड्राईव्हला चपलांचा खच; पाहा VIDEO
Marine DriveANI

टी-२० वर्ल्ड कप २०२४ (T-20 World Cup 2024) जिंकल्यानंतर टीम इंडिया गुरूवारी मायदेशी परतली. टीम इंडियाचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुंबईमध्ये टीम इंडियाची (Team India) विजय रॅली काढण्यात आली होती. टीम इंडियाला पाहण्यासाठी मरीन ड्राइव्हवर क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये ऐवढी गर्दी झाली होती की चेंगराचेंगरीसारखी घटना घडली आणि अनेक जण जखमी झाले. यावेळी काहींना श्वास घेण्यास देखील त्रास झाला. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मरीन ड्राइव्हचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यामुळे मुंबईत गुरुवारी विजयी रॅली काढण्यात आली होती. ही रॅली पाहण्यासाठी आणि त्याचा एक भाग होण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मरीन ड्राइव्ह परिसरात मोठी गर्दी केली होती. लाखोंपेक्षा जास्त क्रिकेटप्रेमी याठिकाणी आले होते. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींची प्रकृती खालावली. तर अनेक जण जखमी झाले. यानंतर पोलिसांनी जखमींना गर्दीतून बाहेर काढून रुग्णालयात नेले. काहींवर उपचार करून घरी सोडण्यात आले तर काही जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. या गर्दीला आवरणं पोलिसांना देखील कठीण झाले होते.

मरीन ड्राइव्ह परिसरात इतकी गर्दी होती की सर्वजण एकमेकांच्या अंगावर जात होते. एकीकडे मरीन ड्राइव्हवर टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्याचा क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला. पण दुसरीकडे यावेळी गर्दीमुळे घडलेल्या घटनांमुळे पोलिसांसह सर्वांनाच त्रास झाला. गर्दीमुळे अनेकांच्या चप्पल हरवल्या. मरीन ड्राइव्ह परिसरातून काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये रस्त्यावर चपलांचा खच पडल्याचे दिसत आहे.

Team India Victory Parade: टीम इंडियाच्या विजय रॅलीदरम्यान अनेकांचा दम घुसमटला; मरीन ड्राईव्हला चपलांचा खच; पाहा VIDEO
Team India victory parade : टीम इंडियाचा मोठा विजय, मोदींच्या भेटीनंतर मुंबई देखील स्वागतासाठी सज्ज, VIDEO

पाऊस असूनही टीम इंडियाच्या विजयी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने आले होते. गर्दी इतकी होती की कित्येक किलोमीटरपर्यंत माणसांशिवाय काहीच दिसत नव्हते. गर्दीत अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. काहींचा दम घुसमटला. तर गर्दीमुळे लोक एकमेकांना धक्का देताना दिसत होते. त्यामुळे अनेक जण जखमीही झाले. या परेडदरम्यान जखमी झालेल्या आणि श्वास घ्यायला त्रास होत असलेल्या १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Team India Victory Parade: टीम इंडियाच्या विजय रॅलीदरम्यान अनेकांचा दम घुसमटला; मरीन ड्राईव्हला चपलांचा खच; पाहा VIDEO
VIDEO: Team India च्या रोड शो साठी गुजरातची बस! विरोधकांची जोरदार टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com