Pimpri Chinchwad : महापालिकेच्या रुग्णालयात जमा झालेल्या रोख रकमेत घोटाळा; अधिकाऱ्यांकडून रक्कम गायब केल्याचा आरोप

Pimpri Chinchwad : जिजामाता रुग्णालयामध्ये दर दिवशी येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी पावती देऊन शुल्क गोळा केली जाते.
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSaam tv

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर येत असल्याची  बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे जिजामाता हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून रोज पावती स्वरूपात जमा करण्यात आलेले लाखो रुपये हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी बँकेत जमाच केले नाही; असा आरोप तक्रारदार किरण नढे यांनी केला आहे. 

Pimpri Chinchwad
Plastic Ban : अकोल्यात प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या ३२ जणांवर कारवाई; अकोला महापालिकेकडून ३८ हजाराचा दंड

पिंपरी चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय सेवा देणारे शहरात जवळपास आठ रुग्णालय आहेत. यापैकी एक असलेल्या जिजामाता रुग्णालयामध्ये दर दिवशी येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी पावती देऊन शुल्क गोळा केली जाते. त्यामुळे रुग्णालयाकडे गोळा झालेली रक्कम बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी दर दिवशी रुग्णालयात येऊन बँकेत जमा करतात. अशी दैनंदिन कामाची पद्धत आहे. मात्र जिजामाता रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवी आणि डॉ. वैशाली बांगर यांनी लिपिक आकाश गोसावी आणि बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांनी मिळून रुग्णालयाच्या (Hospital) भरणा रकमेत मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप तक्रारदार किरण नढे यांनी केला आहे. 

Pimpri Chinchwad
Ahmednagar News : चोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांकडून मारहाण; एकाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

दरम्यान तक्रारदार किरण नढे यांनी जिजामाता हॉस्पिटलकडे १ मार्च ते ३० एप्रिल २०२४ या दोन महिन्याच्या कालावधीची भरणा रकमेची माहिती मागितली होती. १ मार्च ते ३० एप्रिल २०२४ या कालावधी दरम्यान जिजामाता हॉस्पिटलकडे एकूण १८ लाख ६६ हजार ३५६ इतकी रक्कम गोळा झाली होती. त्यापैकी महापालिका हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी आणि लिपिकांनी फक्त ८ लाख ८९ हजार ६६५ इतकी रक्कम बँकेत जमा केली आहे. उर्वरित रक्कम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी स्वखर्चासाठी वापरली, असा आरोप नढे यांनी केला आहे. किरण नढे यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याने महापालिका आयुक्त शेखरसिंह यांनी देखील या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा भरणा रक्कमेतील भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार फक्त महापालिकेच्या एकाच रुग्णालयात नसून महापालिकेच्या इतर रुग्णालयातही होत असल्याचा आरोप तक्रारदार नढे यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com