Plastic Ban : अकोल्यात प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या ३२ जणांवर कारवाई; अकोला महापालिकेकडून ३८ हजाराचा दंड

Akola News : प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र दुकानदार व नागरिक देखील कॅरीबॅग वापरत असल्याचे दिसून येत आहे. मुळात ग्राहकांना पिशवी घेऊन येण्यास सांगितले जात होते
Plastic Ban
Akola CorporationSaam tv
Published On

अक्षय गवळी 
अकोला
: प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अकोल्यात देखील प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असली तरी देखील सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे. अशांविरोधात अकोला महापालिकेने धडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. महापालिकेच्या पथकाने शहरात राबविलेल्या मोहिमेत ३२ छोट्या मोठ्या विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. 

Plastic Ban
Zilha Parishad School : वर्ग खोल्या नसल्याने खुल्या मैदानात झाडाखाली भरतेय शाळा; अकोला जिल्हा परिषद शाळांची अवस्था

प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी (Plastic Ban) घालण्यात आली आहे. मात्र दुकानदार व नागरिक देखील कॅरीबॅग वापरत असल्याचे दिसून येत आहे. मुळात ग्राहकांना पिशवी घेऊन येण्यास सांगितले जात होते. मात्र, पर्याय नसेल तरच ग्राहकांना कागदी व कापडी पिशव्या दिल्या जात होत्या. पण काही दिवसापासून अकोल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचं दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर (Akola) अकोल्याचे मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी एक मोहीम महाबली राबवत प्लास्टिक बंदीसाठी कारवाईचा धडाका सुरू केला. 

Plastic Ban
Ulhasnagar Crime : कचरा टाकण्यावरून वाद; शेजाऱ्याकडून तरुणाला जबर मारहाण

अकोला महापालिकेने सदर कारवाई करण्यासाठी पथकांची नियुक्ती केली. या पथकांद्वारे कारवाई करत अकोल्यात छोट्या मोठ्या विक्रेत्या व्यापाऱ्यांवर प्लास्टिक पिशव्या जप्त करून तब्बल ३२ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या पथकांनी दिवसभरात ३२ ठिकाणी छापे मारून ३८ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर अकोल्यात गेल्या दोन दिवसात ३८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र काही व्यापारी, विक्रेत्यांनी कॅरीबॅग पूर्णतः बंद केली असली तरी याला पर्याय म्हणून कापडी व कागदी पिशव्यांचा वापर सुरू करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com