Ahmednagar News : चोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांकडून मारहाण; एकाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल गावात आलेल्या एका चोराला गावकऱ्यांनी पकडले. त्याला पकडल्यानंतर त्याच गावात राहणाऱ्या कुटुंबाचा हा चोर ओळखीचा असल्याचा संशय गावकऱ्यांना आला
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv

सुशील थोरात 
अहमदनगर
: गावात चोरीच्या उद्देशाने आलेल्या एकास गावकऱ्यांनी पकडले. मात्र गावातील एक कुटुंब हे चोराच्या परिचयातील असून त्यांना गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना अहमदनगरमधील पांगरमल या गावात घडली आहे. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. 

Ahmednagar News
Dombivali Water Supply: डोंबिवली एमआयडीसी भागातील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त; एमआयडीसी कार्यालयात महिलांचे ठिय्या आंदोलन

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पांगरमल गावात आलेल्या एका चोराला गावकऱ्यांनी पकडले. त्याला पकडल्यानंतर त्याच गावात राहणाऱ्या कुटुंबाचा हा चोर ओळखीचा असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. यामुळे गावकऱ्यांनी त्या कुटुंबाला रात्री घरातून उठवून मारहाण करत ग्रामपंचायतीसमोर आणले. या मारहाणीत चांगदेव चव्हाण (वय २०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर त्याची भावजाई आणि अल्पवयीन पुतण्यास जबर (Crime News) मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

Ahmednagar News
Plastic Ban : अकोल्यात प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या ३२ जणांवर कारवाई; अकोला महापालिकेकडून ३८ हजाराचा दंड

दोन जणांना घेतले ताब्यात 

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटनेतील महिलेने आपणास गावातून मारहाण करत ग्रामपंचायती समोर आणून जबर मारहाण करून विनयभंग केला असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र विशिष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करून मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी; अशी मागणी पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com