Dombivali Water Supply: डोंबिवली एमआयडीसी भागातील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त; एमआयडीसी कार्यालयात महिलांचे ठिय्या आंदोलन

Dombivali Water Supply Problem: डोंबिवली एमआयडीसी परिसरात अनेकांचा रहिवासी आहे. मात्र या भागात राहणाऱ्या नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
Water Crisis at Dombivali: डोंबिवली एमआयडीसी भागातील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त; एमआयडीसी कार्यालयात महिलांचे ठिय्या आंदोलन
Protest at Dombivali MIDCSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: डोंबिवली एमआयडीसी निवासी भागासह ग्रामिण भागात गेल्या दोन वर्षांपासून कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा होत आहे. कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक विशेषतः महिला त्रस्त झाल्या आहेत. अनेकदा निवेदन देऊन देखील पाण्याची समस्या सुटत नसल्याने आज एमआयडीसी परिसरातील महिलांनी एमआयडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. 

Water Crisis at Dombivali: डोंबिवली एमआयडीसी भागातील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त; एमआयडीसी कार्यालयात महिलांचे ठिय्या आंदोलन
Pandharpur Wari 2024: आषाढी यात्रेवर निपा, झिकाचे सावट; पंढरपुरात उभारले आयसोलेशन सेंटर

डोंबिवली (Dombivali) एमआयडीसी परिसरात अनेकांचा रहिवासी आहे. मात्र या भागात राहणाऱ्या नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून हि समस्या असून या भागात अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. याबाबत गेल्या दोन वर्षांपासून एमआयडीसी, खासदार, आमदारांकडे वारंवार तक्रारी निवेदन देण्यात आले आहे. तरी देखील पाणी समस्या सुटत नाही. त्यामुळे आज एमआयडीसी निवासी भाग, आजदे परिसरातील महिलांनी थेट डोंबिवलीमधील एमआयडीसी कार्यालय गाठले.

Water Crisis at Dombivali: डोंबिवली एमआयडीसी भागातील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त; एमआयडीसी कार्यालयात महिलांचे ठिय्या आंदोलन
Dhule News : मेंढ्या, बकऱ्यांसह रस्त्यावर उतरत रोखला महामार्ग; विविध मागण्यांसाठी धनगर समाजाचे आंदोलन

एमआयडीसी (MIDC) कार्यालयात महिलांनी ठिय्या आंदोलन करत एमआयडीसी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी केली. यावेळी महिलांनी आंदोलन केल्यानंतर एक- दोन दिवस पाणी पुरवठा सुरळीत होतो. मात्र त्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पाणी समस्या आहे. पावसाचे पाणी भरून आम्हाला दिवस काढावे लागतात. मात्र याचे कुणालाही काही घेणे देणे नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. काही महिलांनी एमआयडीसीकडे पाणी नाही म्हणतात; मग टँकर मधून पाणी पुरवठा कसा केला जातो? असा प्रश्न करत पाणी विकण्याचा व्यवसाय आहे का? असा सवाल उपस्थित केला. पाणी समस्या सुटली नाही, तर येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा देखील यावेळी महिलांनी दिला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com