Dhule News : मेंढ्या, बकऱ्यांसह रस्त्यावर उतरत रोखला महामार्ग; विविध मागण्यांसाठी धनगर समाजाचे आंदोलन

Dhule News : आज राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यात देखील धनगर समाजाने आंदोलन करत रास्ता रोको केला आहे
Dhangar Samaj Rasta Roko
Dhangar Samaj Rasta RokoSaam tv

धुळे : धनगर समाज बांधव शेकडोच्या संख्येने एकत्र येत मेंढ्या व बकऱ्यांसह त्याचबरोबर महिला व बालकांसह रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी या मेंढपाळ बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. साक्री तालुक्यातील महीर फाटा येथे धुळे-साक्री महामार्गावर हा रस्ता रोको सुरू आहे. यामुळे मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली आहे. 

Dhangar Samaj Rasta Roko
Amravati News : धक्कादायक..अमरावती जिल्ह्यात जून महिन्यात २४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

वन जमीन व गायरान जमिनीवर होत असलेले अतिक्रमण तात्काळ थांबवावे. ठेलारी मेंढपाळ समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ठेलारी बांधवांना आधार कार्डवरच रेशन वाटप करण्यात यावे. यासह प्रलंबित असलेल्या आणखी मागण्यांसाठी ठेलारी बांधव आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. याच मागण्यांसाठी आज राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार (Dhule) धुळे जिल्ह्यात देखील धनगर समाजाने आंदोलन करत रास्ता रोको केला आहे. 

Dhangar Samaj Rasta Roko
Pandharpur News : आषाढी यात्रेवर निपा, झिकाचे सावट; पंढरपुरात उभारले आयसोलेशन सेंटर

आंदोलनावर ठाम 

धनगर समाज बांधवांनी रास्ता अडवून धरल्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला असून, वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे बघावयास मिळाले आहे. दरम्यान (Rasta Roko Aandolan) रास्ता रोको आंदोलन थांबवावे यासाठी संबंधित तहसील अधिकारी व पोलीस अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. तरीही ठेलारी बांधव रास्ता रोको आंदोलनावर ठाम असून, जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वतः लेखी आश्वासन देत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्र आंदोलकांनी घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com