VIDEO: चमचमती ट्रॉफी घेऊन 'विश्वविजेती' टीम इंडिया मायदेशी दाखल! क्रिकेटप्रेमींची तुफान गर्दी; खेळाडूंचे जंगी स्वागत

Team India T20 World Cup 2024 Winner Celebration Schedule: टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला धुळ चारून इतिहास घडवल्यानंतर आज विजयी टीम इंडियाचे भारतामध्ये आगमन होत आहे. आधी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मुंबईमध्ये टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघेल.
 चमचमती ट्रॉफी घेऊन 'विश्वविजेती' टीम इंडिया मायदेशी दाखल! क्रिकेटप्रेमींकडून जंगी स्वागत; पाहा पहिला VIDEO
Team India T20 World Cup 2024 Winner Celebration Schedule:Saamtv

दिल्ली, ता. ४ जुलै २०२४

दक्षिण आफ्रिकेला धुळ चारून टी- ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरत भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला. आज विश्वविजेती टीम इंडिया चमचमती ट्रॉफी घेऊन मायदेशी परतली. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर भारतीय संघाचे आगमन झाले असून यावेळी क्रिकेटप्रेमींनी जल्लोषात स्वागत केले.

विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ आज मायदेशी परतणार आहे. अवघ्या काही वेळात दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टीम इंडियाचे आगमन होत आहे.. विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ खराब हवामानामुळे बार्बाडोसमध्ये अडकला होता. मात्र आता काही वेळात रोहित सेना दिल्लीत पोहोचणार आहे.

दिल्लीत भारतीय संघ मुंबईला रवाना होण्यापूर्वी आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये मुक्काम करेल. त्यामुळे संघाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.टीम इंडियाचे शाही स्वागत करण्यासाठी क्रिकेट चाहते दिल्ली विमानतळावर पोहोचले आहेत. विमानतळावर सर्व चाहते भारतीय संघाची वाट पाहत आहेत.

 चमचमती ट्रॉफी घेऊन 'विश्वविजेती' टीम इंडिया मायदेशी दाखल! क्रिकेटप्रेमींकडून जंगी स्वागत; पाहा पहिला VIDEO
T20 World Cup: टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू

दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघणार आहे. ओपन बसमधून सर्व खेळाडूंसह भारतीय संघाची जंगी मिरवणूक होणार आहे. ही विजयी रॅली नरीमन पॉईंटपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत असणार आहे.

 चमचमती ट्रॉफी घेऊन 'विश्वविजेती' टीम इंडिया मायदेशी दाखल! क्रिकेटप्रेमींकडून जंगी स्वागत; पाहा पहिला VIDEO
T20 World Cup Prize Money: वर्ल्डकप विजेत्या संघासाठी 125 कोटींचे बक्षीस जाहीर! कोणाला किती रक्कम मिळणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com