T20 World Cup Prize Money: वर्ल्डकप विजेत्या संघासाठी 125 कोटींचे बक्षीस जाहीर! कोणाला किती रक्कम मिळणार?

BCCI Announced Prize Money For Team India: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाने विजय मिळवलाय. या विजयानंतर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.
T20 World Cup Prize Money: वर्ल्डकप विजेत्या संघासाठी 125 कोटींचे बक्षीस जाहीर! कोणाला किती रक्कम मिळणार?
indian cricket teamtwitter

बारबाडोसमध्ये भारतीय संघाने इतिहास घडवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेती ट्रॉफी उंचावली.गेल्या ११ वर्षांपासून भारतीय संघ आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याच्या प्रतीक्षेत होता. अखेर भारतीय खेळाडूंनी टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरत या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला आहे. दरम्यान या विजयानंतर आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.

भारताचा वर्ल्डकप विजयाचा जगभरात जल्लोष केला जातोय. क्रिकेट फॅन्स या विजयाचा आनंद साजरा करताना दिसून येत आहे. दरम्यान या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने वर्ल्डकपविजेत्या संघावर बक्षिसांचा वर्षाव केला आहे. भारतीय संघाला बीसीसीआयकडून बक्षीस म्हणून १२५ कोटी रुपये दिले जाणार आहेत .दरम्यान खेळाडूंना किती रक्कम मिळणार? जाणून घ्या.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, १२५ कोटींची रक्कम ही १५ खेळाडूंचा संघ, राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य यांच्यात विभागली जाणार आहे. ज्यात राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांचाही समावेश आहे.

T20 World Cup Prize Money: वर्ल्डकप विजेत्या संघासाठी 125 कोटींचे बक्षीस जाहीर! कोणाला किती रक्कम मिळणार?
Rohit Sharma, IND vs SA: हाच फरक आहे.. मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला, रोहितने खेळपट्टीची पवित्र माती चाखली - VIDEO

वर्ल्डकपविजेत्या संघातील खेळाडूंना प्रत्येकी ५ कोटी रुपये मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना प्रत्येकी १-१ कोटी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. १२५ कोटींची रक्कम ही मैदानावर आणि मैदानाबाहेर राहुन मेहनत घेणाऱ्यांमध्ये विभागली जाणार आहे.

T20 World Cup Prize Money: वर्ल्डकप विजेत्या संघासाठी 125 कोटींचे बक्षीस जाहीर! कोणाला किती रक्कम मिळणार?
IND vs SA, Final: कर्णधार असावा तर असा! रोहितने घेतलेल्या या 3 मोठ्या निर्णयांनी टीम इंडियाला बनवलं चॅम्पियन

आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंवरही कोट्यावधींचा वर्षाव केला जातो. या स्पर्धेतील लिलावात खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लावली जाते. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले की, ' आयपीएलच्या या काळात खेळाडूंवर फ्रँचायझींकडून पैशांचा वर्षाव केला जातो. वर्ल्डकप जिंकल्यानंतर १२५ कोटींची घोषणा होणं, हा खेळाडूंसाठी मेसेज आहे की, तुम्ही देशासाठी ट्रॉफी जिंका आणि धनवान व्हा.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com