ms dhoni Social media
Sports

MS Dhoni : IPL 2026 मध्ये धोनी खेळणार की नाही? CSK च्या सीईओंनी दिली मोठी अपडेट

IPL 2026 Updates : आयपीएल २०२६ मध्ये महेंद्रसिंग धोनी खेळणार की नाही याबाबत मोठी अपडेट आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी धोनीसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.

Nandkumar Joshi

  • एमएस धोनी आयपीएल खेळणार का?

  • चेन्नईच्या सीईओंनी दिली महत्वाची अपडेट

  • धोनीसंदर्भात चर्चांना दिला पूर्णविराम

आयपीएल २०२६ मध्ये रोहित शर्मा कोणत्या संघाकडून खेळणार? विराट कोहलीचं काय होणार? महेंद्रसिंग धोनी खेळणार की नाही? आरसीबी संघाचा मालक बदलणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्याचवेळी धोनीच्या खेळण्याबाबतच्या चर्चांवर महत्वाची अपडेट आली आहे. महेंद्रसिंग धोनीचं आयपीएल करिअर अद्याप संपलेलं नाही. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी पुन्हा पुढील मोसमात संघाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती संघाकडून देण्यात आली आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी याबाबत माहिती दिली आहे. धोनीनं स्वतः पुढील पर्वासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. धोनी आणि विश्वनाथन बऱ्याच काळापासून चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएल प्रवासात एकत्र आहेत. संघाला जे आतापर्यंत यश मिळाले आहे, त्यात या दोन्ही शिलेदारांचा मोठा वाटा राहिलेला आहे.

धोनी पुन्हा चेन्नई संघाकडून खेळणार का अशी चर्चा आयपीएलच्या मागील काही सीझनपासून सुरू आहे. आयपीएल २०२६ चं पर्व सुरू होण्यास बराच वेळ आहे. त्याआधीच धोनीबाबत पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. पण चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

धोनीची अखेरची आयपीएल?

मागील मोसमात चेन्नई संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. पॉइंट्स टेबलमध्ये संघ शेवटच्या स्थानी होता. ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत धोनीनं कर्णधारपद सांभाळलं होतं. आता धोनी पुढील मोसमात चेन्नईकडून मैदानात उतरून शेवट गोड करणार आहे. ही त्याची अखेरची आयपीएल स्पर्धा असू शकते, असं मानलं जात आहे.

धोनी आयपीएलमध्ये आतापर्यंत २४८ सामने खेळला आहे. त्यात त्यानं ४८६५ धावा केल्या आहेत. तसेच संघाला पाच वेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये चेन्नईनं आयपीएल स्पर्धा जिंकली होती. जर यावेळच्या आयपीएल स्पर्धेत धोनी मैदानात उतरला तर, त्याचं हे १७ वे वर्ष असणार आहे.

संजू सॅमसनवर नजरा

चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएल स्पर्धेसाठी आतापासूनच रणनीती आखत असल्याचं कळतंय. सीईओ विश्वनाथन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड, प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांच्यात १० आणि ११ नोव्हेंबरला बैठक होईल अशी शक्यता आहे. त्यात रिटेंशन आणि ट्रेड संबंधित महत्वाचे निर्णय घेण्यात येतील.

मीडिया रिपोर्टनुसार, संजू सॅमसनच्या ट्रेडची चर्चा पुन्हा सीएसकेच्या चमूत सुरू आहे. चेन्नई आणि राजस्थान यांच्यात या संभाव्य डीलबाबत चर्चा सुरू आहे. चेन्नईचा दिग्गज खेळाडू या डीलमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सॅमसनच्या संभाव्य ट्रेडसंदर्भात रणनीती काय असेल हे पुढील काही दिवसात अधिक स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT