India A Squad : वनडे संघात रोहित शर्मा, विराट कोहलीला स्थान नाही; इंडिया ए संघाची घोषणा, तिलक वर्मा कॅप्टन

India A squad announced : दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली. या संघात रोहित शर्मा, विराट कोहलीला स्थान देण्यात आलं नाही.
No Place Rohit Sharma Virat Kohli  India A Squad Against South africa A
No Place Rohit Sharma Virat Kohli India A Squad Against South africa A saam tv
Published On

भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ यांच्यात कसोटी मालिकेनंतर वनडे मालिका होणार आहे. १३ ते १९ नोव्हेंबर या काळात ही मालिका खेळवली जाणार आहे. राजकोटमध्ये हे सामने होणार आहेत. या वनडे मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं नाही.

दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध भारत अ या दोन संघांत वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वनडे मालिकेच्या आधी खेळाडूंचा सराव व्हावा यासाठी या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना या मालिकेसाठी भारत अ संघात स्थान दिलेले नाही.

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. या दोघांनाही भारताच्या अ संघात स्थान दिलं जाऊ शकतं, अशी सुरुवातीला चर्चा होती. पण निवड समितीनं त्यांना संघात स्थान दिले नाही. या वनडे मालिकेसाठी भारत अ संघाचं नेतृत्व तिलक वर्मा याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. तर ऋतुराज गायकवाड याला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.

टी २० मधील अव्वल फलंदाज अभिषेक शर्मा याला देखील भारत अ संघात संधी दिली आहे. याशिवाय ईशान किशन, रियान पराग हे देखील संघात असणार आहेत. वेगवान गोलंदाज हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा यांचा देखील संघात समावेश आहे. माजी कर्णधार श्रेयस अय्यर या मालिकेसाठी उपलब्ध नाही. मागील महिन्यात एका सामन्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. रणजी ट्रॉफीमध्ये झारखंडकडून खेळताना दमदार कामगिरी केल्याचं बक्षीस ईशान किशनला मिळालं आहे. १४ जणांच्या चमूमध्ये त्याची निवड झाली आहे. टी २० मध्ये भारताकडून खेळताना चमकदार कामगिरी करणारे अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणालाही संधी देण्यात आली आहे.

भारत अ संघ पुढीलप्रमाणे

तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, ईशान किशन, आयुष बदोनी, निशांत सिंधू, विप्राज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, प्रभासिमरन सिंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com