ms dhoni reaction on shivam dube half century video went viral amd2000 twitter
क्रीडा

Shivam Dube News: चेपॉकवर दुबेचा जलवा! फास्टेस्ट फिफ्टीनंतर धोनीने दिलेल्या रिॲक्शन व्हायरल - Video

MS Dhoni Reaction On Shivam Dube Half Century: दुबेने २३ चेंडूंचा सामना करत ५१ धावांची खेळी केली. या सामन्यानंतर एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

MS Dhoni Reaction On Shivam Dube Inning:

युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. या संघाने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघावर जोरदार विजय मिळवला.

आता दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्सला नमवत स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आहे. या विजयात चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने शानदार खेळ करुन दाखवला. त्याने २३ चेंडूंचा सामना करत ५१ धावांची खेळी केली. या सामन्यानंतर एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

धोनीचा रिअॅक्शन व्हायरल..

या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या शिवम दुबेने २२ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पू्र्ण केलं. हे या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक ठरलं आहे. या खेळीदरम्यान त्याने ५ षटकार मारले. या वादळी खेळीनंतर धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात धोनी उभा राहुन शिवम दुबेचं कौतुक करताना दिसून आला आहे. धोनीसह संघातील इतर खेळाडूंनी देखील शिवम दुबेचं उभं राहुन कौतुक केलं.

चेन्नईचा शानदार विजय..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकअखेर २०६ धावा केल्या. चेन्नईकडून फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्रने प्रत्येकी ४६-४६ धावांची खेळी केली. (Cricket news in marathi)

त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या शिवम दुबेने अर्धशतकी खेळी केली. गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी २०७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाला १४३ धावांपर्यंत मजल मारता आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT