ms dhoni hits back to back 3 sixes on hardik pandya bowling watch video amd2000 twitter
Sports

MS Dhoni Sixes: तो आला अन् त्याने धू धू धुतलं.. हार्दिकच्या गोलंदाजीवर धोनीचे लागोपाठ ३ षटकार - Video

MS Dhoni 3 Sixes On Hardik Pandya Bowling: या सामन्यात फलंदाजी करत असताना एमएस धोनीने हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर लागोपाठ ३ षटकार मारले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात एमएस धोनीचा हटके अंदाज पाहायला मिळाला. शेवटच्या षटकात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या धोनीने हार्दिक पंड्याच्या शेवटच्या षटकात लागोपाठ ३ षटकार मारले.

यादरम्यान त्याने अवघ्या ४ चेंडूत २० धावांची तुफानी खेळी केली. ज्यात ३ षटकारांचा समावेश होता. हार्दिक पंड्याच्या या षटकात एकूण २६ धावा कुटल्या गेल्या. दरम्यान धोनीने हार्दिकला सलग ३ षटकार मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

चेन्नईने उभारला २०६ धावांचा डोंगर..

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकअखेर ४ गडी बाद २०६ धावा केल्या. चेन्नईकडून फलंदाजी करताना कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४० चेंडूत सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ५ षटकार मारले. तर शिवम दुबेने ३८ चेंडूत ६६ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले.

धोनीचा हल्लाबोल..

एमएस धोनीची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. तो पॅड आणि हेल्मेट घालून फलंदाजीला यायला तयार होता. मात्र त्याला काही संधी मिळत नव्हती. अखेर शेवटच्या षटकात विकेट पडली आणि त्याला फलंदाजीला यायची संधी मिळाली. ही संधी मिळताच त्याने संधीचं सोनं केलं आणि चाहत्यांचं फुन ऑन एन्टरटेन्मेंट केलं. त्याने शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेल्या हार्दिक पंड्याच्या षटकात २६ धावा कुटल्या. यादरम्यान त्याने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग ३ षटकार मारले. तर शेवटच्या चेंडूवर २ धावा घेत संघाची धावसंख्या २०६ वर पोहचवली.

मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०७ धावांचा गरज होती. मात्र मुंबईचा संघ या धावांचा यशस्वी पाठलाग करू शकला नाही. मुंबईकडून माजी कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी व्यर्थ गेली. कारण मुंबईला हा सामना २० धावांनी गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : घराबाहेर खेळताना घेऊन गेले, निर्जनस्थळी नेवून तिघांनी आळीपाळीने ८ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार; दिल्ली हादरली

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये ५०० सिलेंडर जप्त, ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

Eknath Shinde : एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला का गेले? मोदींसोबतच्या भेटीनंतर सगळं काही सांगितलं

Linen Or Cotton Silk Saree Designs: ऑफिसमध्ये तुम्हीच दिसाल स्टायलिश, प्रोफेशनल लूकसाठी नेसा 'लिनन आणि कॉटन सिल्क साडी'

IPL 2026 : धोनीसह यंदा आयपीएलमधून ५ जण निवृत्त होणार, या नावाची चर्चा

SCROLL FOR NEXT