Bribe Case : सरकारी कामासाठी लाच घेताना बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं, ठाण्यात खळबळ

Mumbai Thane Bribe Case News : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि शिपाई ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACBच्या सापळ्यात अडकले. जांभळी नाका परिसरात कारवाई करून दोघांना अटक करण्यात आली.
Thane Bribe Case News
Thane Bribe Case News AI Image
Published On
Summary
  • ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि शिपाईवर कारवाई

  • ५० हजारांची लाच स्वीकारताना ACBच्या सापळ्यात अडकले

  • ११ सप्टेंबरला जांभळी नाका परिसरात ACBने सापळा रचून अटक केली

  • पोलीस तपास सुरु

ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. सरकारी काम करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. शुक्रवारी सायंकाळी जांभळी नाका परिसरात ही कारवाई करण्यात आली. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात महसूल सहाय्यक गणेश बालकृष्ण मोरे (वय ५२) आणि शिपाई खालिद गुलाब शेख (वय ५३) यांना अटक करण्यात आली आहे.

ACBच्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पत्नीचे ‘आपले सरकार’ सेवा केंद्र मिरा रोड पूर्वेतील सोना रिव्हेट इमारतीमध्ये २०१७ पासून सुरू होते. मात्र, इमारत जीर्ण झाल्यामुळे हे सेवा केंद्र मिरा रोड पूर्वेतील राबिया टॉवरमधील दुकान क्रमांक ७ येथे स्थलांतरित करण्यात आले. नवीन ठिकाणचा पत्ता सरकारी पोर्टलवर अपडेट करण्यासाठी तक्रारदाराने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू व नोंदणी शाखेत अर्ज केला होता.

Thane Bribe Case News
Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

मात्र, अर्जावर प्रक्रिया करून सेवा केंद्राची पोर्टलवरील नोंद सक्रिय करण्यासाठी आरोपींनी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. त्यानंतर तक्रारदाराने ACBकडे याबाबत तक्रार केली. १० सप्टेंबर रोजी पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पडताळणीत गणेश मोरे आणि खालिद शेख यांनी लाचेची मागणी केल्याचे तसेच ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे स्पष्ट झाले.

Thane Bribe Case News
High Court : दारू पिऊन मोठा आवाज करणे गुन्हा ठरू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वाचे निरीक्षण

तक्रारीची खात्री झाल्यानंतर ACBच्या पथकाने ११ सप्टेंबरच्या सायंकाळी जांभळी नाका परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताच दोन्ही आरोपींना पथकाने ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान आरोपींच्या हाताच्या तळव्यांवर आणि बोटांवर सापळ्यात वापरण्यात आलेल्या अँथ्रासीन पावडर आढळून आले. या कारवाईमुळे शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, प्रकरणाचा पुढील तपास ACBकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com