Vijay-Trisha Viral Video: अजित कुमारच्या रेसिंग इव्हेंटमध्ये CM विजय आणि तृषा कृष्णन एकत्र; व्हिडीओ व्हायरल

Vijay-Trisha Viral Video: सिल्व्हरस्टोन येथे अजित कुमारच्या ले मॅन्स शर्यतीला मुख्यमंत्री विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन उपस्थित होत्या. विजय-अजितची भेट आणि त्रिशासोबतचा क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
Vijay-Trisha Viral Video
Vijay-Trisha Viral VideoSaam Tv
Published On

Vijay-Trisha Viral Video: दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय कलाकार अजित कुमार आणि तमिलनाडूचे मुख्यमंत्री विजय सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहेत. अजित कुमार यांच्या मिशेलिन ले मॅन्स कपच्या सिल्व्हरस्टोन फेरीसाठी विजय ब्रिटनमध्ये पोहोचले होते. यावेळी अभिनेत्री तृषा कृष्णनदेखील उपस्थित होती. या भेटीचे आणि रेसिंग सर्किटवरील काही क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

विजय आणि अजित यांच्या चाहत्यांना दोन्ही सुपरस्टार एकाच ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळताच सिल्व्हरस्टोन येथे मोठी गर्दी झाली. शर्यतीपूर्वी विजय आणि अजित एका तंबूमध्ये असताना तृषा कृष्णनही त्यांच्यासोबत दिसली. एका चाहत्याने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत ‘एके आणि थलापती यांच्यासोबत तृषा’ असे कॅप्शनमध्ये लिहिले.

Vijay-Trisha Viral Video
Ameesha Patel: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईच्या घरात कामवाल्या बाईनेच केली चोरी, लाखोंच्या हिऱ्यांच्या बांगड्या चोरल्या

त्रिशा शनिवारी सिल्व्हरस्टोन येथे पोहोचली. ती जीन्स, टी-शर्ट आणि मरून रंगाचे जॅकेट परिधान करून कारमधून बाहेर पडताना दिसली. त्यानंतर ती रेसिंग सर्किटवरील तंबूमध्ये गेली. दरम्यान, अजित कुमार यांच्या शर्यतीवेळी विजय, तृषा कृष्णन हे प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये एकत्र उभे असल्याचे आणखी एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. कॅमेरा त्यांच्या दिशेने वळला असताना त्रिशा खाली सुरू असलेल्या रेसिंगकडे पाहण्यासाठी वाकल्या. त्याचवेळी विजय यांनी त्यांच्याकडे पाहिल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. हा छोटासा क्षण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये त्याची चर्चा रंगली आहे.

Vijay-Trisha Viral Video
Bigg Boss 20: सलमान खानला 'या' स्पर्धकावर भडकला; पहिल्या वीकेंड वारमध्ये काढणार खरडपट्टी

विजय आणि तृषा यांच्या मैत्रीचीही यानिमित्ताने चर्चा होत आहे. मे २०२६ मध्ये विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी तृषा उपस्थित होती. त्या विजय यांच्या कुटुंबासोबतही दिसली होती. विजय यांच्या पहिल्या भाषणावेळी त्रिशा भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. स्वातंत्र्यदिनीही त्या विजय यांच्या कुटुंबासोबत दिसली होती. त्यामुळे सिल्व्हरस्टोनमधील त्यांची उपस्थिती आणि विजयसोबतचा व्हायरल क्षण चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com