Maharashtra News Live Update: कुडाळ रेल्वे स्थानकात रोटरी क्लबतर्फे २ हजार कापडी पिशव्यांचे वाटप

Marathi Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे मराठा आंदोलन, अमित शहा मुंबई दौरा, राज्यात गणरायाच्या आगमनाची तयारी, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

कुडाळ रेल्वे स्थानकात रोटरी क्लबतर्फे २ हजार कापडी पिशव्यांचे वाटप

कुडाळ रेल्वे स्थानकात रोटरी क्लबतर्फे २ हजार कापडी पिशव्यांचे वाटप

प्लास्टिकमुक्तीसाठी मुंबईकर कोकणवासीयांना आवाहन

Solapur : विंचूरमध्ये गॅस सिलिंडर स्फोट; तीन घरे झाली आगीत भस्मसात

विंचूरमध्ये गॅस सिलिंडर स्फोट; तीन घरे झाली आगीत भस्मसात

सुदैवाने जीवितहानी नाही; संसारोपयोगी साहित्य जळाले, तीन कुटुंबे उघड्यावर

Pune : पुण्यात हजारो महिलांच्या उपस्थित पार पडणार सामूहिक अथर्वशीर्ष पठण

पुण्यात हजारो महिलांच्या उपस्थित पार पडणार सामूहिक अथर्वशीर्ष पठण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे १५ सप्टेंबर रोजी पहाटे ५.४५ वाजता पार पडणार कार्यक्रम

ऋषीपंचमी निमित्त दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थित अथर्वशीर्ष पठण च्या कार्यक्रमाचे आयोजन

सकाळी ६ वाजता अथर्वशीर्ष म्हणायला होणार सुरुवात

नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार

- नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार

- “उत्सवाला विरोध नाही, गोंगाटाला विरोध!” या ब्रिदवाक्याचे फलक हातात घेऊन नागरिक सहभागी.

- डीजे विरोधातील मोर्चात भाजप नेते संदीप जोशी सहभागी होणार

संजय राऊतांचा वार , अशोक चव्हाण यांचा पलटवार

संजय राऊतांचा वार , अशोक चव्हाण यांचा पलटवार

अशोक चव्हाण भाजपात गेले ना , मग जा आता मोदीकडे मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावा - संजय राऊत

खरी शिवसेना शिंदेची , त्यामुळे शेवटची तडफड सुरू आहे - अशोक चव्हाण

पुण्यातील जांभूळवाडी येथील पुलावर भीषण अपघात

पुण्यातील जांभूळवाडी येथील पुलावर भीषण अपघात

अपघात चारचाकीचा चक्काचूर झाला असून ट्रक पलटी झाला आहे

जांभुळवाडी दरी पुलावर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर वाहनाला आग

मुंबई गोवा महामार्गावर वाहनाला आग

मुंबई वरून कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर एर्टिगा कार जळून खाक

महामार्गावरील वडखळ जवळच्या जिते गावाजवळ आग लागल्याची घटना

Mahaashtra Rain Update : राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात

मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यात गणेशोत्सवापूर्वी पावसाचा जोर वाढला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com