IND vs WI saam tv
Sports

IND vs WI: मोहम्मद सिराजने स्टार्कला टाकलं मागे; 'अशी' कामगिरी करणारा बनला जगातला पहिला गोलंदाज

Mohammed Siraj most Test wickets 2025: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सिराजने ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याला मागे टाकलंय.

Surabhi Jayashree Jagdish

अहमदाबादमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू झालेल्या टेस्ट सिरीजच्या पहिल्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने उत्तम कामगिरी केली. यावेळी त्याने वेस्ट इंडीजचा टॉप ऑर्डरचा धुव्वा उडवला. सिराजने पहिल्या डावात एकूण ४ विकेट्स घेतले. त्यापैकी तीन महत्त्वाचे विकेट्स त्याने सुरुवातीच्या सेशनमध्येच घेतले.

मोहम्मद सिराजच्या या कामगिरीमुळे त्याने २०२५ साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) खेळणाऱ्या सर्व टीम्समधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनण्याचा मान मिळवला.

अहमदाबाद टेस्टमध्ये सिराजने वेस्ट इंडिजच्या टॉप ऑर्डरला उध्वस्त केलं. सिराजने चार विकेट्स घेतल्या आणि एक नवा विक्रम केला. त्याने शेवटच्या १२ डावात ३० विकेट्स घेऊन मिशेल स्टार्कला मागे टाकलंय.

सिराजची खास कामगिरी

सिराजने या वर्षी आतापर्यंत ७ टेस्ट सामन्यांच्या १२ डावांत एकूण ३० विकेट्स घेतले आहेत. वेस्ट इंडीजविरुद्ध तिसरी विकेट घेताच त्याने या वर्षातील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला. याच वेळी त्याने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला मागे टाकलंय. स्टार्कने १४ डावांत २९ विकेट्स घेतल्या आहेत.

ही कामगिरी सिराजच्या करिअरसाठी विशेष ठरलीये. कारण तो आता भारतीय गोलंदाजीचा कणा बनत आहेत. अहमदाबादच्या पिचवर त्याने लयीत गोलंदाजी करत सुरुवातीपासूनच कॅरिबियन फलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्याच्या तीव्र स्विंग आणि अचूक लाइन-लेंथमुळे वेस्ट इंडीजची टॉप ऑर्डर कोसळली.

WTC 2025 मधील टॉप ५ गोलंदाज

  • मोहम्मद सिराज – ३० विकेट्स (१२ डाव)

  • मिचेल स्टार्क – २९ विकेट्स (१४ डाव)

  • नॅथन लायन – २४ विकेट्स (११ डाव)

  • शमार जोसेफ – २२ विकेट्स (६ डाव)

  • जोश टंग – २१ विकेट्स (८ डाव)

सिराजची ही कामगिरी फक्त या वर्षापुरती मर्यादित नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (२०२५-२७) नव्या सायकलमध्येही तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. भारताने या सायकलची सुरुवात इंग्लंडविरुद्ध ५ टेस्ट सामन्यांच्या सिरीजने केली होती. ही सिरीज २-२ अशी बरोबरीत सुटली, मात्र या सिरीजमध्ये सिराज भारताचा सर्वात मोठा मॅचविनर ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर

Instagram: तुम्ही जे बोलता किंवा विचार करता तेच इन्स्टाग्रामवर दिसतं? कारण काय? वाचा सविस्तर

Sanjay Raut Vs Ramdas kadam: रामदास कदमांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं'; संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर

Snake Bite : नुकसानीचे पंचनामे करताना तलाठ्याला सर्पदंश; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Pakistan: पाकिस्तानला पुन्हा हादरा! पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT