IND vs WI 1st Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जसप्रीत बुमराहनं घडवला इतिहास; केला अनोखा कारनामा

Jasprit Bumrah IND vs WI 1st Test: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजी केली. बुमराहने तीन विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजी पूर्णपणे कमकुवत केली.
Jasprit Bumrah IND vs WI 1st Test
Jasprit Bumrah celebrates after completing 50 wickets at home in the World Test Championship against West Indies.saam tv
Published On

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचे फलंदाजी ढेपाळली. त्यांनी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. संपूर्ण वेस्ट इंडिजचा संघ फक्त १६२ धावा करू शकला. भारताकडून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येत रोखण्यात या तिन्ही गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (Jasprit Bumrah Creates History With 50 Wickets In World Test Championship)

Jasprit Bumrah IND vs WI 1st Test
IND Vs PAK Final सामन्यात राडा! जसप्रीत बुमराह संतापला अन् साहिबजादा फरहानला भिडला, नक्की काय घडलं? VIDEO

जसप्रीत बुमराहची कमाल

जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या. बुमराहचा यॉर्कर अतुलनीय असतो, जेव्हा तो फॉर्ममध्ये असताना गोलंदाजी करतो तेव्हा तो कोणत्याही फलंदाजाला तंबूत पाठवत असतो.

दरम्यान आजच्या सामन्यातील डावात बुमराहने सलामीवीर जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्हज आणि जोहान लिन यांना बाद केलं. या तीन विकेटासह बुमराहाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घरच्या मैदानावर ५० विकेट घेण्याचा विक्रम केला.

देशात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ५० विकेट घेणारा पहिला भारतीय जलद गती गोलंदाज ठरलाय. त्याच्या आधी रविचंद्रन अश्विनने (१४९ विकेट्स) आणि रवींद्र जडेजा (९४ विकेट्स घेतल्या आहेत. यांनी घरच्या मैदानावर झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. परंतु हे दोघेही फिरकी गोलंदाज आहेत.

Jasprit Bumrah IND vs WI 1st Test
Jasprit Bumrah : आशिया कप संपताच बुमराहचा मोठा निर्णय; इन्स्टाग्राम स्टोरीनं सस्पेन्स वाढला!

WTC मध्ये घरच्या मैदानावर एकूण १३ कसोटी सामने

जसप्रीत बुमराहने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घरच्या मैदानावर एकूण १३ सामने खेळलेत. यात त्याने ५० विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका डावात ४५ धावा देत ६ बळी घेतले होते.

भारतासाठी २०० पेक्षा जास्त कसोटी विकेट्स

जसप्रीत बुमराह हा भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याने एकट्याने अनेक सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिलाय. त्याने २०१८ मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून त्याने ४९ कसोटी सामन्यांमध्ये एकूण २२२ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये १५ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com