
मीराबाई चानूने जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.
हे तिचे जागतिक स्पर्धेतील तिसरे पदक आहे.
चीनच्या थान्याथनशी तिची जबरदस्त चुरस होती.
भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने नॉर्वेमधील फोर्डेमध्ये सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकून पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ही स्पर्धा मीराबाईसाठी विशेष ठरली कारण जागतिक स्पर्धेच्या इतिहासातील हे तिचं तिसरं पदक आहे. यासह ती भारतासाठी सर्वाधिक विश्वचषक पदकं जिंकणारी तिसरी महिला वेटलिफ्टर ठरली आहे.
मीराबाईने यापूर्वी २०१७ मध्ये अमेरिकेतील Anaheim मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत ४८ किलो वजनाच्या गटात गोल्ड मेडल पटकावलं होतं. २०२२ मध्ये कोलंबियातील बोगोटामध्ये झालेल्या स्पर्धेत तिने ४९ किलो गटात रौप्यपदक जिंकलं होतं.
या स्पर्धेत मीराबाई चानूने ४८ किलो वजनी गटात एकूण १९९ किलो वजन उचलत दुसरं स्थान मिळवलंय. स्नॅच राऊंडमध्ये तिने ८४ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११५ किलो वजन उचललं. उत्तर कोरियाच्या री सांग गुम हिने एकूण २१३ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावलं. चीनच्या थान्याथनसोबत मीराबाईची चुरस पाहायला मिळाली.
या स्पर्धेत थान्याथनने ब्रॉन्स मेडल जिंकलं. स्नॅच राऊंडमध्ये ती मीराबाईपेक्षा ४ किलोने आघाडीवर होती. मात्र क्लीन अँड जर्कमध्ये मीराबाईने अप्रतिम कामगिरी करत थान्याथनला मागे टाकले आणि १ किलोच्या फरकाने सिल्वर मेडल आपल्या नावावर केलं. तिच्या या विजयानंतर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
पदक जिंकल्यानंतर मीराबाई थेट आपल्या कोच विजय शर्मा यांच्या जवळ गेली आणि त्यांचे आभार मानले. गेल्या काही वर्षांत दुखापतींमुळे तिच्यासाठी काळ कठीण गेला होता. मात्र तिने चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर कमबॅक करत याच वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं.
मीराबाई चानू ही भारतासाठी जागतिक स्पर्धेत दोनहून अधिक वेळा पदक जिंकणारी तिसरी खेळाडू ठरलीये. तिच्याआधी कुंजरानी देवी आणि कर्णम मल्लेश्वरी यांनी ही कामगिरी केली होती. कुंजरानी देवीने १९८९ ते १९९७ दरम्यान तब्बल सात वेळा सिल्वर मेडल जिंकलं. तर कर्णम मल्लेश्वरीने १९९४ आणि १९९५ मध्ये गोल्ड मेडल तसंच १९९३ आणि १९९६ मध्ये ब्रॉन्स मिळवत एकूण चार पदकांची कमाई केली होती.
मीराबाईने कुठे सिल्वर मेडल जिंकले?
नॉर्वेतील फोर्डे येथे जागतिक स्पर्धेत जिंकले.
तिची जागतिक पदक किती झाली?
एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदके झाली.
कोणत्या वजनगटात तिने स्पर्धा केली?
४८ किलो वजनगटात स्पर्धा केली.
सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर कोरियाच्या री सांग गुमने जिंकले.
मीराबाईने विजयाचे श्रेय कोणाला दिले?
तिने श्रेय कोच विजय शर्मांना दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.