MI vs RR IPL 2024 tos update mumab indians vs rajasthan royals cricket news in marathi amd2000 twitter
Sports

MI vs RR, IPL 2024: राजस्थानचा नाणेफेक जिंकत बॉलिंगचा निर्णय! अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

Mumbai Indians vs Rajasthan Royals Toss Update: आयपीएल २०२४ स्पर्धेतील १४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

MI vs RR, IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅससनने नाणेफेक जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

मुंबूई इंडियन्स- ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएट्ज़ी, पीयूष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाखा.

राजस्थान रॉयल्स - यशस्वी जायस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईचा पहिला सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध पार पडला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजयाच्या अगदी जवळ पोहचल्यानंतर पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यानंतर मुंबईचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात मुंबईला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात हैदाराबाद संघाने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. (Cricket news in marathi)

आता सलग २ सामने गमावल्यानंतर मुंबईचा संघ होम ग्राऊंडवर खेळताना विजयाचं खातं उघडण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने या हंगामातील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून राजस्थानचा संघ विजयाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हेड टू हेड रेकॉर्ड..

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघ २८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सने १५ तर राजस्थान रॉयल्स संघाने १२ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. दरम्यान एक सामना बरोबरीत सुटला होता. दोन्ही संघांच्या सर्वोच्च धावसंख्येबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्सने २१४ धावा केल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्सने २१२ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT