Hardik Pandya: हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई होणार? MCA ने स्पष्टच सांगितलं

MCA Clarification On Hardik Pandya Trolling: आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. मुंबईला ५ वेळेस चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिकला कर्णधार बनवलं गेलं.
there are no instructions given to security who trolls hardik pandya mumbai in mumbai  cricket association says these are rumours
there are no instructions given to security who trolls hardik pandya mumbai in mumbai cricket association says these are rumours twitter

MCA On Hardik Pandya:

आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. मुंबईला ५ वेळेस चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिकला कर्णधार बनवलं गेलं. हा निर्णय क्रिकेट चाहत्यांना पटलेला नाही.

अनेक क्रिकेट चाहत्यांना या निर्णयाचा विरोध केला. मुंबईचं कर्णधारपद स्विकारल्यानंतर हार्दिक पंड्या पहिल्यांदाच वानखेडेवर खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्पष्टीकरण दिलं आहे.

रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिकला कर्णधारपद देणं हे मुंबईच्या फॅन्सला आवडलेलं नाही. पहिल्या दिवसापासूनच या निर्णयाचा जोरदार विरोध केला जातोय. क्रिकेटचं मैदान असो की सोशल मीडिया जिकडे तिकडे हार्दिकला ट्रोल केलं जात आहे.

मुंबईचे गेले दोन सामने हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये पार पडले. हे दोन्ही सामने होम ग्राऊंडवर नव्हते. तरीदेखील हार्दिक पंड्याला जोरदार ट्रोल केलं गेलं. मुंबईचा पुढील सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यातही हार्दिकला जोरदार ट्रोल केलं जाईल असा अंदाज आहे. (Cricket news in marathi)

there are no instructions given to security who trolls hardik pandya mumbai in mumbai  cricket association says these are rumours
IPL 2024, GT vs SRH: अहमदाबादमध्ये गुजरात- हैदाराबाद आमने- सामने! कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

सोशल मीडियावर अशा चर्चा सुरु होत्या की,एमसीएने सुरक्षा वाढवली आहे. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. हार्दिकला त्रास देणाऱ्या किंवा त्याला ट्रोल करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाईल. अशा लोकांना स्टेडियमच्या बाहेर काढले जाणार जाईल. या सर्व अफवा असल्याचं एमसीएने म्हटलं आहे.

एमसीएचं स्पष्टीकरण...

या सामन्यासाठी एमसीएने नियमावली बनवली असल्याची केवळ अफवा आहे. रोहितला सपोर्ट करणाऱ्या आणि हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार ही केवळ अफवा आहे. अशी कुठलीही नियमावली लागु करण्यात आलेली नाही.

there are no instructions given to security who trolls hardik pandya mumbai in mumbai  cricket association says these are rumours
CSK vs DC, IPL 2024: गुरु की शिष्य; कोण मारणार बाजी? कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com