हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही विजयाचा नारळ फोडू शकलेला नाही. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनेही मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आहे. दरम्यान या दुहेरी धक्क्यानंतर मुंबई इंडियन्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादवबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
सूर्यकुमार यादव सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळताना दिसून आला नव्हता. त्याला NCA कडून अजूनही फिटनेस सर्टिफिकेट मिळालेलं नाही. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. पीटीआयने दिलेल्या. वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आयपीएल २०२४ स्पर्धेतील आणखी काही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Cricket news in marathi)
सूर्यकुमार यादव संघात नसणं ही मुंबई इंडियन्स संघासाठी चिंता वाढवणारी बाब आहे. कारण त्याने अनेकदा जबाबदारी घेत मध्यक्रमात फलंदाजीला येऊन मोठी खेळी केली आहे. त्याच्या अनुपस्थितीत मधल्या फळीतील फलंदाजांकडून हवं तसं योगदान मिळत नाहीये. तसेच मुंबई इंडियन्स संघात सूर्यकुमार यादव सारखा जबाबदारी घेऊन सामना जिंकून देणारा इतर फलंदाज नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झाला होता दुखापतग्रस्त..
रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली गेली होती. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. तेव्हापासून तो मैदानापासुन दूर आहे. त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो फिट आहे. मात्र तो फिटनेस चाचणी पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.