Mi vs KKR toss prediction match prediction mumbai indians vs Kolkata knight riders amd2000 google
Sports

MI vs KKR, Toss Prediction: टॉस ठरेल बॉस! KKR ला हरवण्यासाठी मुंबईने आधी काय करावं?

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Toss Prediction: मुंबई इंडियन्स संघासाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे.दरम्यान नाणेफेक जिंकून आधी मुंबईने काय करावं? जाणून घ्या.

Ankush Dhavre

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या हंगामाची पराभवाने सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने १० पैकी ७ सामने गमावले आहेत. तर अवघ्या ३ सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवता आला आहे. मुंबईचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे. प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणं मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. दरम्यान हा सामना जर जिंकायचा असेल तर मुंबईला आधी टॉस जिंकणं महत्वाचं असणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघामध्ये आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५१ वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या स्टेडियमवरील खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर, ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. या मैदानावर धावांचा पाऊस पाडला जातो. मुंबई इंडियन्स संघाने अनेकदा फलंदाजी करताना २०० धावांचा पल्ला गाठला आहे.

काय सांगतो रेकॉर्ड?

या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर आतापर्यंत ११३ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५२ सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ६१ सामने जिंकले आहेत. तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने ५९ सामने जिंकले आहेत. तर नाणेफेक गमावणाऱ्या संघाने ५४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे या मैदानावर सामना जिंकायचा असेल तर नाणेफेक जिंकणही तितकच महत्वाचं आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

इशान किशन( यष्टिरक्षक) रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या ( कर्णधार) टीम डेव्हिड, नेहाल वढेरा, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्जी, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह

कोलकाता नाईट रायडर्स संघाची संभावित प्लेइंग ११

फिल सॉल्ट ( यष्टिरक्षक), सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर ( कर्णधार), आंद्रे रसल, रिंकू सिंग, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, अनुकूल रॉय, वरूण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Best Mileage Tips: गाडी वेगात चालवायची की हळू? कोणता वेग देतो सर्वाधिक मायलेज?

Nashik : नाशिमध्ये पावसाचा फटका! निफाड रेल्वेस्थानकाबाहेर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी, वाहन चालकांचे हाल | VIDEO

Shweta Tiwari: श्वेता तिवारीपुढे सर्व अभिनेत्री फिक्या, चाळीशीतलं सौंदर्य वाढवेल हृदयाची धडधड

Allu Arjun: AA22xA6 मध्ये पुष्पाचा नवा अंदाज; साऊथ चित्रपटात झळकणार हॉलिवूडचा व्हिलन

SCROLL FOR NEXT