राजकीय भूकंप! थेट मंत्र्याच्याच घरावर ED ची धाड, १५ हून अधिक ठिकाणी छापेमारीमुळे खळबळ, काय आहे प्रकरण?

Satish Jarkiholi, ED Raid Karnataka : कर्नाटकचे PWD मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या बंगळुरूतील निवासस्थानासह कर्नाटक आणि महाराष्ट्रातील १५ हून अधिक ठिकाणी ईडीने छापेमारी केली.
Satish Jarkiholi, ED Raid Karnataka
Satish Jarkiholi, ED Raid KarnatakaSaam TV Marathi
Published On

ED raids Satish Jarkiholi residence in Karnataka : कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री सतीश जारकीहोली आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी सकाळी अचानक छापे टाकले. आबकारी विभागातील कथित गैरव्यवहार, बार परवाना अनियमितता आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही मोठी शोधमोहीम सुरू केली आहे.

बंगळुरूतील डॉलर्स कॉलनीतील मंत्र्यांचे निवासस्थान, तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील १५ हून अधिक ठिकाणी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात त्यांच्या खासदार कन्या प्रियंका जारकीहोली यांच्याशी संबंधित मालमत्तांचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Satish Jarkiholi, ED Raid Karnataka
Pune Dry Day : पुण्यात 'या' ५ महत्त्वाच्या दिवशी दारू विक्री पूर्णपणे बंद, उत्पादन शुल्क विभागाचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने बुधवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या कडेकोट सुरक्षेत छापे टाकण्यास सुरुवात केली. बंगळूरमधील पाच प्रमुख ठिकाणांशिवाय मंत्री आणि त्यांचे मेहुणे मंजुनाथ यांच्या बेळगाव आणि महाराष्ट्रातील घरे व कार्यालयांचीही झडती घेतली जात आहे. या ठिकाणी सापडलेल्या आर्थिक कागदपत्रे, बँक खाती आणि मालमत्तेच्या कागदपत्रांची अधिकारी बारकाईने तपासणी करत आहेत.

Satish Jarkiholi, ED Raid Karnataka
महाराष्ट्रात RTO ची मोठी धडक मोहीम! मुंबई, नाशिक, ठाण्यात सर्वांत मोठा दणका; पाहा तुमची गाडी तर यात नाही ना?

आरोप काय आहेत?

उत्पादन शुल्क विभागातील कथित अनियमिततेशी संबंधित हे प्रकरण आहे. सतीश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा वापर करून नियमांना बगल देत सुमारे १८ बारना बेकायदेशीरपणे परवाने दिल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांचा दावा आहे की, या बारमधून मिळालेला अवैध नफा परदेशात बेकायदेशीरपणे गुंतवण्यात आला. प्राथमिक तपासात ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अवैध अपहार झाल्याचे उघड झाले आहे. अंमलबारी संचालनालय (ईडी) आता या निधी हस्तांतरणाचा स्रोत आणि जाळे निश्चित करण्यासाठी कागदपत्रांची तपासणी करत आहे.

मेहुण्यावर कारवाई करण्यात आली

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला, ईडीने कर्नाटक उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या विरोधात कारवाई केली. मंजुनाथ हे जारकीहोळी यांचे मेहुणे आहेत. त्यानंतर ईडीने मंजुनाथ यांच्याशी संबंधित सहा ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांदरम्यान, ईडीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. अधिकाऱ्यांना मंजुनाथ यांच्या घरातून रोकडही सापडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com