Kidney problems: पायांवर दिसून येणारी 4 लक्षणं सांगतायत की किडनी लवकरच होणारे खराब

Surabhi Jayashree Jagdish

किडनी

आपल्या शरीरात दररोज तयार होणारी घाण बाहेर काढण्याचं काम किडनी करत असते. पण आपण खूप कमी पाणी प्यायलो किंवा सतत खूप जास्त मीठ व जंक फूड खाल्लं तर किडनीचं कामात अडथळा येतो. तसंच डॉक्टरांना न विचारता मनानेच वारंवार औषधे घेतल्यानेही किडन्यांना इजा पोहचते.

Kidney warning signs | saam tv

शरीरात घाण साचणं

जेव्हा किडनीचं कार्य बिघडतं तेव्हा तेव्हा त्या शरीरातील घाण आणि जास्त झालेलं पाणी लघवीवाटे बाहेर टाकू शकत नाहीत. त्यामुळे ही सगळी घाण आपल्या रक्तामध्येच जमा होऊ लागते. रक्तातील ही घाण मग हळूहळू संपूर्ण शरीरात पसरायला सुरुवात होते.

Leg swelling kidney problems | saam tv

पायांवर परिणाम

आपण जेव्हा उभे राहतो किंवा बसतो, तेव्हा शरीरातील जास्त साचलेलं पाणी गुरुत्वाकर्षणामुळे खालच्या दिशेने म्हणजेच पायांकडे जातं. त्यामुळे किडनीच्या कोणत्याही समस्येचा परिणाम आपल्याला पायांवरच दिसून येतो.

Itchy legs kidney disease | saam tv

पायांवर आणि घोट्यांवर सूज येणे

किडनीने काम करणं कमी केल्यामुळे शरीरात जमा झालेलं पाणी पायांमध्ये जमा होते. यामुळे पाय आणि घोट्यांना सूज येते. पाय सुजल्यामुळे चप्पल किंवा शूज घट्ट होतात आणि चालायला त्रास होतो.

Kidney disease leg cramps | saam tv

पायावर दाब दिल्यास खड्डा पडणं

जर पायाला सूज आली असेल आणि आपण तिथे अंगठ्याने थोडे दाबलं तर तिथे लगेच एक छोटा खड्डा तयार होतो. बोट काढून घेतल्यानंतरही तो खड्डा काही वेळ तसाच राहतो आणि त्वचा लगेच वर येत नाही. हे लक्षण किडनी नीट काम करत नसल्याचं असतं.

Kidney failure symptoms | saam tv

पायांना खाज सुटणे

रक्तामध्ये साचलेली घाण बाहेर न पडल्यामुळे ती पायांच्या त्वचेखाली जाऊन जमा होते. यामुळे पायांची त्वचा खूप कोरडी पडते आणि तिथे खूप खाज सुटू लागते.

Swollen ankles causes | saam tv

पायांमध्ये गोळे येणं

आपल्या शरीराला आणि स्नायूंना नीट काम करण्यासाठी काही विशिष्ट ताकदीच्या घटकांची गरज असते. किडनी खराब झाल्यावर या घटकांचं प्रमाण बिघडतं ज्यामुळे पायांचे स्नायू कडक होतात. यामुळे रात्री झोपेत असताना पायात अचानक गोळे येतात.

Kidney disease symptoms in feet | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Weight loss | saam tv
येथे क्लिक करा