आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हे दोन्ही संघ या हंगामात पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग ११.
हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी जिंकणं अतिशय महत्वाचा असणार आहे. मुंबई इंडियन्स संघाला १० पैकी केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. हा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे.
तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. हा सामना जिंकून कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्लेऑफच्या दिशेने आगेकूच करण्याची संधी असणार आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल.
मुंबईची प्लेइंग ११ बदलणार?
मुंबई इंडियन्स संघात कुठलाही बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण संघातील सर्वच खेळाडू पूर्णपणे फिट आहेत. सुरुवातीच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराह हा कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी कर्दनकाळ ठरू शकतो. कोलकाता नाईट रायडर्स संघातील फलंदाज सुनील नरेन, फिल सॉल्ट सध्या तुफान फॉर्ममध्ये त्यामुळे जसप्रीत बुमराहवर मोठी जबाबदारी असणार आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..
इशान किशन( यष्टिरक्षक) रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या ( कर्णधार) टीम डेव्हिड, नेहाल वढेरा, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्जी, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह
कोलकाता नाईट रायडर्स संघाची संभावित प्लेइंग ११
फिल सॉल्ट ( यष्टिरक्षक), सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर ( कर्णधार), आंद्रे रसल, रिंकू सिंग, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, अनुकूल रॉय, वरूण चक्रवर्ती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.