येवला-मनमाड महामार्गावर गोपाळवाडी फाट्याजवळ भीषण अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार
अँकर-नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील येवला-मनमाड महामार्गावरील गोपाळवाडी फाटा परिसरात अज्ञात वाहनाने
मोटरसायकलला दिलेल्या भीषण धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यातील कारेगाव खु. शिवारातील नाल्याच्या पुलावर कार आणि मॅक्झिमोची जोरदार धडक झाली. या अपघातात मॅक्झिमो चालक गंभीर, तर कार चालक किरकोळ जखमी झाला. जखमींना तात्काळ उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली.
सरकारने तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी उबाठाचे परभणीतील आमदार डॉ राहुल पाटील यांनी केली आहे.
राहुल पाटील यांनी आज पालम आणि गंगाखेड तालुक्यात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद ही साधला.
यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे सरकार घोटाळेबाज सरकार आहे यांना शेतकऱ्यांचे काही देणेघेने नसल्याचे म्हटले आहे.
एकीकडे सरकार पैसे देत नाही दुसरीकडे पीक विम्याचेही ट्रिगर काढून घेतल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार आताच पिके वाळून गेली आहेत.
तर ऑक्टोबर महिन्यात हे काय पिक कापणी प्रयोग करणार आणि काय पिक विमा देणार असेही ते म्हणाले आहेत.
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण
संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करण्यात आला होता
आरोपी संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला
तपासाच्या प्राथमिक टप्प्यात आरोपीला सोडणे समाजासाठी घातक ठरू शकते, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा आदेश दिला.
रस्त्यावरील खड्डयांच्या विरोधात रायगडच्या कर्जतमध्ये अनोखे आंदोलन सुरु आहे. गणेशमुर्ती घेऊन पोलिस मित्र संघटनेचे पदाधिकारी रस्त्यावर आंदोलनाला बसले असून आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे मुक्त सुरक्षित रस्ते मिळावेत अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. कर्जत परिसरातील रस्ते खड्डे मुक्त व्हावेत यासाठी 7 सप्टेबरपासून हे आंदोलन सुरु असून या आंदोलनाची कोणतीच दखल प्रशासनाने घेतली नसल्याने प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “राज्याचे विषय संसदेत मांडायचे असतात, ते आम्ही संसदेत टाहो फोडून बोलतो,” असं म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. जिल्हा नियोजनासाठी केंद्राकडून निधी येत असतानाही त्यावरील अधिकार आमदार आणि पालकमंत्र्यांकडेच का, असा सवाल कोल्हेंनी उपस्थित केला. निधीवाटपात पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींना समान अधिकार मिळण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वटफळी येथे तरुण शेतकर्याची आत्महत्या
कर्जाच्या विवंचनेत उचलले टोकाचे पाऊल; पत्नी, चिमुकलीवर दुःखाचा डोंगर
नेर तालुक्यातील वटफळी येथील घटना
सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरांचे उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या
ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि सत्ताधारी शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक अशोक वैती यांनी आज महापालिकेचे उपायुक्त गजानन गोदेपुरे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी गोदेपुरे यांच्या कार्यालयाबाहेरील नामफलकाला पुष्पहार घालत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
तब्बल सोळा वर्षानंतर झालेल्या बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोधक निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी गोविंद मिरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. २१ संचालकांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली, २१ संचालकांपैकी १२ जण बिनविरोध निवडून आले होते. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड या प्रमुख नेत्यांचा समावेश होता.
नागपूर शहर RTO च्या परमिट विभागात नियमबाह्य कामकाज, कर्तव्यकसूर आणि शासनाच्या महसुलाचे संभाव्य नुकसान झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने केला आहे.
शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मित्रपक्ष भाजपवर जोरदार टीका केली.
भाजपचे काही लोक लग्नसमारंभातही कमळाचा बिल्ला लावतात, असा खोचक टोला त्यांनी लगावला. भाजप कार्यकर्ते मंत्रालयातही बिल्ला लावून फिरतात, त्यामुळे शिवसैनिकांनीही छातीवर धनुष्यबाण लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबई-सावंतवाडी मार्गावर नव्याने सुरू झालेल्या नियमित रेल्वेसेवेचे सावंतवाडी रोड स्थानकावर उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. गाडी स्थानकात दाखल होताच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने इंजिनचे पूजन, पुष्पहार अर्पण करून लोको पायलटांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून या नव्या रेल्वेसेवेचा आनंद साजरा करण्यात आला.
माजी आमदार रमेश कदम यांनी प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांच्या भूमिकेवर टीका केली. महाराष्ट्रातील 13 टक्के आरक्षणाच्या आतील मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. 2008 साली लहुजी साळवे मातंग समाज आयोगाचे अध्यक्ष असताना ही भूमिका मांडल्याचे कदम यांनी सांगितले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 2018 मध्ये जयपूर येथे झालेल्या सभेत राफेल व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप आहे. या वक्तव्याविरोधात भाजप पदाधिकारी महेश श्रीमाळ यांनी गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
पुण्यात मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याच्या कथित प्रकरणाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत उमटले आहेत. या प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत महासभा तहकूब करण्याची मागणी केली. भाजपच्या आग्रहानंतर केडीएमसीची नियोजित महासभा तहकूब करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे संतप्त मराठा आंदोलकांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर फाडले. मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील विखे पाटील यांच्या वक्तव्यावरून आंदोलकांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लावण्यात आलेले विखे पाटील यांचे बॅनर आंदोलकांनी फाडत राज्य सरकार आणि विखे पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात चिखली शहरात ५८ जाती समुदायांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागांतून हजारो आंबेडकर अनुयायी तसेच १८ पगड जाती समुदायातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चामध्ये आनंदराज आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि पँथर सेनेचे दीपक केदार सहभागी झाले. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चानंतर चिखली तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता ऑगस्ट 2027 पर्यंत पाणीसाठा पुरेल यासाठी नियोजन करण्याचे निर्देश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत त्यानुसार वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जलाशयातील पाणी आरक्षित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नियमापेक्षा अधिक उपसा होत असेल तर यावर पथक नेमून कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
शिंदे आणि शिरसाट यांनी मिळून प्रमाणपत्र रद्द केली
तुम्ही माझं आणि मराठ्यांचं काहीही वाकडं करू शकत नाही
तब्बल एक वर्ष विखेंनी आमचा घात केला
फडणवीस आरक्षण देऊ शकत नाही हे मान्य करा
मराठ्यांना संपवण्याची सरकारची भूमिका
आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न
बैलपोळा सणासाठी पंढरपूर परिसरातील साखर कारखान्यांनी 200 रुपयांचा हप्ता द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चंद्रकांत बागल यांनी आज पंढरपूर तहसील कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
गेल्या काही दिवसांपासून विविध शेतकरी संघटनांकडून ऊसदराच्या बिलासाठी आंदोलन सुरू आहे. आज शेतकरी संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच चंद्रकांत बागल यांनी अचानक सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेतले आणि स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला.
सर्व मागण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत
२०१४ पासून मराठा समाजाला न्याय देण्यास सुरुवात
जरांगेंचे गैरसमज नेहमी दूर केलेत
सरकार जरांगेच्या सोबत आहे
गेल्या आठवड्यापासून माकडाने खर्डी हायस्कूल मध्ये धुमाकूळ घातला आहे यामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षक देखील दाखवले असून आज चक्क माकडा मुळे विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून बाहेर पडल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी व डब्ल्यू डब्ल्यू ठाणे यांची टिम हायस्कूल मध्ये दाखल होत माकड पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
जात पडताळणी समितीकडे आलेल्या २१ हजार ५१ अर्जांपैकी १६ हजार ११० प्रमाणपत्रे देण्यात आली असून, ६४ अर्ज अवैध ठरले आहेत. वंशावळीसह काही बाबींमुळे अर्ज नाकारले गेले. मराठा समाजाला न्याय्य हक्क मिळावा, ही सरकारची भूमिका असून OBCच्या हक्काला धक्का लागणार नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायतींमध्ये कुणबी नोंदी लावण्याची प्रक्रिया ७ सप्टेंबरपासून सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडगाव तालुक्यातील गेंदा शिवारात छापा टाकून तब्बल 93 लाख रुपये किमतीचा 186 किलो गांजा जप्त केला आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेंदा येथील एका शेतात तपासणी केली. यावेळी संशयित निर्मल वनकर पावरा याने आपल्या ज्वारीच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचे समोर आले.
पोलिसांनी गांजाची सर्व झाडे जप्त केली असून, आरोपी निर्मल वनकर पावरा याच्याविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) कृष्णा बाबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ACBच्या या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका दाखल गुन्ह्यातील आरोपीचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी तसेच प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात API कृष्णा बाबर यांनी आरोपीच्या नातेवाईकाकडे लाचेची मागणी केली होती.
ही लाच स्वीकारताना ACBच्या पथकाने कृष्णा बाबर यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून AI जनरेटेड व्हिडिओ व विविध पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन याला चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी ५ सप्टेंबर रोजी चेन्नईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान नशिराबादपर्यंत धागेदोरे पोहोचल्यानंतर चेन्नई सायबर क्राईमचे पथक नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि होमगार्डला अटक करून पुढील तपासासाठी चेन्नईला घेऊन गेले. या कारवाईमुळे नशिराबाद परिसरात मोठी खळबळ उडाली असून, बनावट अकाउंटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे
विद्यानंद बापट यांच्या डीजे बंदीच्या मागणीनंतर आमदार सदाभाऊ खोतदेखील आता डीजे बंदीच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. सांगलीमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत ‘डीजे संस्कृती संपवूया, पारंपरिक संस्कृती जपूया’ असा नारा देण्यात आला.
डीजेवर बंदी घालून हिंदुस्तानी संस्कृतीचा वारसा असलेल्या पारंपरिक वाद्यांचा गजर उत्सवांमध्ये असावा, यासाठी शहरातील मारुती चौक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक वाद्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी स्वतः ढोलवादन करत आणि लेझीम खेळत पारंपरिक वाद्यांचे समर्थन केले.
पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय
प्रथमेश देशमुख असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव
आत्महत्या करणाऱ्या तरुणावर अडीच लाखांचे कर्ज
धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
तेर पवारवाडी येथे अडवला धाराशिव कडे जाणारा रस्ता
सरकारने मनोज जरांगे यांच्या सोबत चर्चा न करण्याचा निर्णय घेतल्याने मराठा समाज बांधवांत तीव्र नाराजी
छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयात बैठकीला सुरुवात
सरकारचे शिष्टमंडळ, माजी न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मराठा आरक्षण अभ्यासक बैठकीला उपस्थित
कुणबी नोंदी, हैदराबाद गॅझेटनुसार मिळालेल्या कुणबी नोंदींवर होणार चर्चा
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.
जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना रोखण्यासाठी शेतकरी हातात दांडकी आणि उसाचा बुडका घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.
कुठल्याही परिस्थितीत जमीन मोजणी होऊ देणार नाही, असा आक्रमक इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय
पिंपरी चिंचवड शहरातील चिंबळी फाट्या जवळ असलेल्या पॉलीमार्क या प्लास्टिकच्या कारखान्याला काही वेळापूर्वी भीषण आग लागली आहे.
कारखान्याला लागलेल्या आगीत काही कामगार अडकून बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी कार्यालयात आज हाय व्होल्टेज बैठक
पोलिसांकडून स्मार्ट सिटी कार्यालयाला छावणीचे स्वरूप; तगडा बंदोबस्त
सरकारचे शिष्टमंडळ, माजी न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मराठा आरक्षण अभ्यासक बैठकीला उपस्थित
देवगडहून कोल्हापूरच्या दिशेने बैलाची अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो गोरक्षकांनी पोलिसांच्या सहकार्याने तरेळे येथे पकडला.
या टेम्पोमध्ये 16 बैल दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.
मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम...
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा 12 वा दिवस,
आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का याकडे लक्ष.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पारोळा पोलिसांना यश आले आहे. घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आरोपीला जेरबंद करत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातातून गेला आहे. अनेक भागांत पावसाअभावी उभी पिके करपू लागली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर वर्षभराच्या कष्टाची राख होताना दिसत आहे.
मुंबईत गणेशमूर्ती कोसळण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. भुलेश्वरच्या राजापाठोपाठ कुर्ल्यातही गणेशमूर्ती कोसळली. कुर्ल्यातील प्रेमनगरचा राजा गणेशमूर्ती वाजतगाजत आणत असताना स्पीड ब्रेकरवरून मूर्तीचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. या दुर्घटनेत 2 जण जखमी झाले आहेत.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे विज मीटर तपासणीचे शासकीय काम सुरू असताना महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.. मारहाणीचा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला असून, मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. धांदरफळ बुद्रुक येथील प्रदीप इंजिनिअर वर्क्स या दुकानात मीटर तपासणीचे काम सुरू असताना, महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली..
अमरावतीच्या दर्यापूर परिसरामध्ये गेल्या 40 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी , सोयाबीन तूर,पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दर्यापूर तालुक्यातील थिलोरी आरळा, नायगाव या परिसरात पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाकरिता हजारो रुपये खर्च केले आहेत. खत बी बियाणे, फवारणी करून शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे परंतु गेल्या 40 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे .त्यामुळे सरकारने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी बांधवांच्या वतीने केली जात आहे.
पोळा... हा सण म्हणजे केवळ सण नाही, तर बळीराजाचा आपल्या सर्जा- राजाप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस .. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि त्यांच्या कामाचा शिणभाग दूर करण्यासाठी शेतकरी हा सण अत्यंत आनंदाने आणि भक्तीभावाने साजरा करतात.. मात्र, यावर्षी पावसाने दिलेल्या प्रदीर्घ ओढीमुळे कोरड्या दुष्काळाचे पोळा सणावर सावट असतानाही, शेतकऱ्यांचे मध्ये उत्साह आहे .. पोळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत.. पिके सुकत असताना शेतकऱ्यांसमोर बैलपोळ्याचा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला..
राज्यात पाऊस लांबल्याने खरीप हंगाम संकटात आलाय. दुबार-तिबार पेरणी आणि आता पावसाचा खंड.. 40 दिवस झाले पावसाचा एक थेंब नाहीये,.. अशातच विदर्भातील बहुतांश भागात शेतकऱ्यांचा खरीप हंगामात संकटात आलाय. मायबाप सरकार मदत करा, शेतकऱ्यांची काळीज चिरणारी मदतीची हाक पाहायला मिळते.. आज अकोल्यातील सर्वांच मनसुन्न करणारा प्रकार समोर आलाय.. आर्थिक संकटात पडलेल्या अकोल्यातील मोरळ गावातील शेतकऱ्यांनी भावुक होतं थेट सोयाबीन पिकांना अग्नी दिलीय.. यावेळी शेतकऱ्यांचा टोहो, आणि आक्रोश पाहायला मिळालाय...
लातूरच्या औसा तालुक्यात देखील पावसाने दडी मारल्याने अनेक भागांतील खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. मागील महिनाभरापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली. सोयाबीनचे पीक ऐन बहरात असताना मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यावर वरून राजा कोपला. आणि हातात तोंडाशी आलेला घास हिरावला. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील सोपान कल्याणकर या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतीमध्ये सोयाबीन पेरलं होतं.
काल रात्री नऊ वाजून 38 मिनिटांनी नेपाळची राजधानी काठमांडू पासून उत्तर पश्चिम परिसरातील मनासलु पर्वत रांगेत 5.0 रिश्चटर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. हा तोच परिसर आहे ज्या परिसरात 26 ऑगस्ट रोजी ग्लेसिअर फुटून महापूर आला होता. त्यामुळे नेपाळ सरकारने या परिसरातून वाहणाऱ्या त्रिशूली व इतर नदीकाठच्या नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेष करून नुवाकोट जिल्ह्यातील नागरिकांना पुढील 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नेपाळ सैन्य दलाच्या तुकड्या, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके या परिसरात तळ ठोकून आहेत.
४ बेस ४ टॉप निर्णय मान्य असून सुद्धा पोलिस कारवाई करत असल्याचा साउंड व्यावसायिकांचा आरोप
पुणे पोलिसांनी घालून दिलेल्या अटी आणि शर्ती चे पालन केल्यानंतर सुद्धा होते आहे कारवाई
दही हंडी उत्सव दरम्यान अनेक ठिकाणी नियम पाळून सुद्धा साउंड सिस्टिम जप्त केल्याचा व्यावसायिकांचा आरोप
फक्त साउंड सिस्टिम बद्दल का दुःख? साउंड व्यावसायिकांचा प्रश्न
पोलिस प्रशासनाकडून होणाऱ्या जप्तीच्या कारवाई विरोधात व्यावसायिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत
चाकण औद्योगिक वसाहतीतील पुणे-नाशिक महामार्गावर सकाळपासून वाहतुकीचा बोजवारा उडालाय
अनेक वर्षांपासून रखडलेल्या परभणीच्या पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना अखेर मुहूर्त लागला असून या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे.आराखड्यात मंजूर असलेल्या कामांना कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ सुरुवात करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दराने पुन्हा उसळी घेतली असून, काल कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सर्वाधिक 8 हजार 700 रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय... गेल्या तीन महिन्यातील हा दर सर्वाधिक आहे.
कारंजा बाजार समितीत पाच दिवसांपूर्वी तुरीला 8 हजार 425 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला होता. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात तुरीच्या दरात वाढ होऊन हेच तुरीचे दर आता 8 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहेत.मात्र,आता मोजक्याच शेतकऱ्यांकडं तूर शिल्लक असूनही,काल कारंजा बाजार समितीत 1 हजार 50 क्विंटल तुरीची आवक झाल्याचं बघायला मिळालं...तुरीच्या दरात येत्या काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता बाजार तज्ञांनी वर्तवलीये.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे मराठा बांधवांनी आमरण उपोषण सुरू केल आहे. मागील तीन दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आम्ही 12 सप्टेंबर रोजी मुंबईला जाणार असा निर्धार पिंपळगाव महादेव येथील मराठा बांधवांनी केला आहे.सरकारवर मराठा समाजाचा रोष आहे. सरकारने रस्ते अडवले काही जरी केलं तरी मुंबईला जाणार असल्याचा इशारा पिंपळगाव महादेव येथील मराठा बांधवांनी दिला आहे.
भिवंडी नाभिक समाज उन्नती मंडळ भिवंडीच्या वतीने मंगळवारी संत सेना महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन कोंबडपाड्यातील गाजेंगी हॉलसमोरील पार्वती मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सत्यनारायणाची महापूजा,भक्त गीते,सत्कार समारंभ ,विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि वह्या वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासह भक्तांसाठी रात्री महाप्रसाद (भंडारा) ठेवण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.